Header Ads

Header ADS

शास्त्रीजींच्या अंगी असलेले सद्गुण सर्वांनी आत्मसाद केले पाहिजे व हेच त्यांच्या जयंती निमित्त खरे अभिवादन-शास्त्री अनंत प्रकाश दासजी

Śāstrījīn̄cyā-aṅgī-asalēlē-sadguṇa-sarvānnī-ātmasāda-kēlē-pāhijē-va-hēca-tyān̄cyā-jayantī-nimitta-kharē-abhivādana-śāstrī-ananta-prakāśa-dāsajī


शास्त्रीजींच्या अंगी असलेले सद्गुण सर्वांनी आत्मसाद केले पाहिजे व हेच त्यांच्या जयंती निमित्त खरे अभिवादन-शास्त्री अनंत प्रकाश दासजी

 लेवाजगत न्यूज सावदा-श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था सावदा संचलित श्री पी. एल्. नेमाडे प्राथमिक विद्यामंदिर सावदा,श्री स्वामिनारायण माध्यमिक विद्यालय सावदा,श्री स्वामिनारायण इंग्लिश मिडीयम (सी .बी .एस .ई ) स्कूल सावदा,श्री स्वामिनारायण प्री-प्रायमरी स्कूल सावदा येथे आज दि. ०९/०९/२०२४ सोमवार रोजी संस्थेचे माजी उपाध्यक्षअ.नि.प.पू. स.गु. शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी  यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष प.पू. स.गु.  शास्त्री श्री अनंतप्रकाशदासजी यांनी भक्तीकिशोरदासजी यांच्याविषयी बोलताना त्यांनी केलेल्या अनुवादित  ग्रंथाची माहिती व त्यामागील त्यांनी केलेली मेहनत  या बद्दल सांगितले, तसेच शास्त्रीजींच्या अंगी जे सद्गुण होते ते गुण  सर्वांनी आत्मसाद केले पाहिजे व हेच त्यांच्या जयंती निमित्त खरे अभिवादन ठरेल असेही सांगितले. सूत्रसंचालक श्री निलेश बोरोले सर यांनी शास्त्रीजीच्या जीवना विषयी व कार्य विषयी माहिती सांगितली तसेच श्रद्धांजली व अभिवादन या मधील फरक सुद्धा विद्यार्थ्यांना  सांगितला.  या अभिवादन सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष प.पू.स. गु. शास्त्री श्री अनंतप्रकाशदासजी, संस्थेचे संचालक श्री पी. डी. पाटील सर, प्राचार्य श्री संजय वाघूळदे सर ,पर्यवेक्षिका सौ. अश्विनी चौधरी मॅडम, सौ. माधुरी चौधरी मॅडम, सी.बी.एस्.ई. चे समन्वयक श्री. गिरीश नेमाडे सर ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन श्री निलेश बोरोले सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.