Header Ads

Header ADS

सावदा येथे उप बाजार समिती आवारात वृक्षारोपण

 

Sawada-here-sub-market- committee-premises-plantation

सावदा येथे उप बाजार समिती आवारात वृक्षारोपण

लेवा जगात न्यूज सावदा -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार समिती आवारात आज संचालक सैय्यद अझगर सैय्यद तुकडू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन व्यापारी किरण नेमाडे व कर्मचारी उपस्थित होते.

  गुरुवार रोजी सावदा येथील फैजपुर रोडवरील बाजार समितीच्या आवारात वळ,पिंपळ,चिंच अशा पाच ते सहा फूट उंचीच्या ४० रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. हे लागवड केल्यानंतर येथील व्यापारी व कर्मचाऱ्यांनी वृक्ष संवर्धन करण्याची व त्यांना जगवण्याची जबाबदारी घेतली असून यामुळे आवारात बाजारात गुरांना,म्हशींना व येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांना या वृक्षांमुळे सावलीचे व्यवस्था उन्हाळ्यात होईल . या वृक्षारोपणामुळे व्यापारी वर्ग व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.