Header Ads

Header ADS

"सावदा पोलीस पथकाने पकडला" दोन लाखाचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा;दोन जण ताब्यात

 

Savada-police-team-caught-two-lakh-worth-of-scented-tobacco-and-Vimal-gutkha-two-persons-in-possession

"सावदा पोलीस पथकाने पकडला" दोन लाखाचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा;दोन जण ताब्यात

लेवा जगत न्यूज सावदादिनांक २४ -आज रोजी महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे उत्पादन, विक्री, वितरण व साठा तसेच वाहतुक यासाठी प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक करतांना दोन आरोपींविरुध्द सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांचे कडून दोन लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

             सावदा पोलीस स्टेशन हद्दीत अनिल ओंकार पाटील वय-४०, रा.शिवाजीनगर जळगाव व  रोहीत मुकेश बरकले, वय-२२ रा.शिवपुर, ता.भुसावळ हे सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक करित असलेबाबतची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्या वरून त्यांनी तात्काळ सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस पथकास रवाना करुन  सापळा रचुन   दोघांना लुमखेडा ता.रावेर शिवारात सावदा ते हतनुर धरण रोडवर पाटाचे चारीजवळ पकडुन त्यांचेजवळ   दोन लाख पाचशे साठ २,००,५६०/-रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा मोटार सायकलीसह पथकास  मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप,पोहेकाँ संजीव चौधरी,पोकाँ सुनिल कुरकुरे,पोकाँ बबन तडवी यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.