Header Ads

Header ADS

सावदा पोलीसांनी केले नशिराबाद येथिल महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आरोपीस जेरबंद

सावदा पोलीसांनी केले नशिराबाद येथिल महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आरोपीस जेरबंद

 लेवा जगत न्यूज सावदा - नशिराबाद पोलीस स्टेशन कडील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात दिड महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस सावदा पोलीसांनी केले जेरबंद.

   


Savada-police-made-nashirabad-yethil-woman-absconding-accused-in-prison
           


जळगांव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराच्या दाखल गुन्हयातील आरोपी मोहीत दिलीप कोळी रा.भादली बु.ता.जि.जळगांव हा मागील दिड महिन्यापासुन नशिराबाद पोलीसांना मिळत येत नव्हता. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  मनोरे यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना माहीती देवुन सदरचा आरोपी हा सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेबाबत कळविल्याने सपोनि श्री.विशाल पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ पोहेकाँ. विजय पोहेकर,पोहेकाँ सिकंदर तडवी,पोकाँ.सुनिल कुरकुरे,पोकाँ. बबन तडवी,पोकाँ. विनोद दामोदर या कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करून आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले.

       सदर पोलीस पथकाने वरील आरोपीची  गोपनीय माहिती काढून त्यास गाते तालुका रावेर येथे त्याचे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेवून  सावदा येथे पोलीस स्टेशनला आणले त्याचे कडे चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाई करिता नशीराबाद पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक  गणेश देशमुख व पथक यांचे ताब्यात दिले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.