Header Ads

Header ADS

सावदा येथे श्रीमद् भागवत सप्ताह पारायण ज्ञानयज्ञाचे गुरुवार पासून आयोजन

 

Savada-here-Shrimad-Bhagwat-organization-of-week-parayana-jnanayajna-from-Thursday

सावदा येथे श्रीमद् भागवत सप्ताह पारायण ज्ञानयज्ञाचे गुरुवार पासून आयोजन

लेवा जगत न्यूज सावदा- येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथे वडतालधाम द्विशताब्दी महोत्सव अंतर्गत योगी वर्य सद्गुरू श्री गोपालानंद स्वामी, वडताल पीठाधीपती आचार्य राकेश प्रसाद जी महाराज, अक्षर निवासी स्वामी नीलकंठ दासजी,शास्त्री स्वामी धर्मप्रसाद दासजी ,अक्षर निवासी शास्त्री स्वामी भक्ती किशोर दासजी यांच्या आशीर्वादाने शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दासजी यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी यांच्या संकल्पनेने स्वामीनारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह पारायण यज्ञाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केले आहे.

 या वर्षी भागवत सप्ताह पारायणाचे हे ४९ वे वर्ष असून कथा वक्ताश्री स्वामीनारायण गुरुकुल संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दासजी करवतील तसेच संहिता पाठ शास्त्री स्वामी धर्म किशोर दासजी हे करतील.

   श्रीमद् भागवत सप्ताह पारायणाचे कथा प्रारंभ भाद्रपद शुद्ध ९संवत २०८० दिनांक १२ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी होत असून कथेची वेळ दररोज दुपारी दोन ते पाच आहे.

   या कथा सोहळ्या दरम्यान आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज सतपंत मंदिर संस्थान फैजपूर ,महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज खंडोबा वाडी देवस्थान फैजपूर, स्वामी धर्मस्वरूपदाचे श्री स्वामीनारायण मंदिर भुसावल,कोठारी स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामीनारायण मंदिर जळगाव,स्वामी केके शास्त्री स्वामीनारायण गुरुकुल साकेगाव ,स्वामी राजेंद्र प्रसाद दासजी स्वामीनारायण मंदिर यावल, महंत श्री सुरेश राज शास्त्री मानेकर मोठेबाबा दत्त मंदिर संस्थान सावदा, महंत कृष्णगिरी महाराज सोमवारगिरी मढी सावदा, कोठारी स्वामी रघुवीर चरणदासजी श्री स्वामीनारायण मंदिर बऱ्हाणपूर,ह भ प दुर्गादास महाराज खिर्डी ,धनराज महाराज श्री जगन्नाथ महाराज देवस्थान अंजाळा, महंत श्री स्वरूपानंद जी महाराज श्री शेत्र डोंगरदे, कोठारी स्वामी प्रेमप्रकाश दासजी श्री स्वामीनाथ मंदिर मालोद, कोठारी स्वामी जगत प्रकाश दासजी श्री हनुमंत मंदिर देवस्थान सुना सावखेडा,कोठारी स्वामी भगवतस्वरूप दासजी श्री स्वामीनारायण मंदिर मोहराळा हे संतगण संत दर्शनासाठी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहे.

     या कथेचा मांगलिक कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असून गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी कथा प्रारंभ ,शुक्रवार १३ रोजी नृसिंह जन्म ,शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी वामन जन्म,रविवार १५ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्म ,सोमवार १६ सप्टेंबर रोजी गोपाळकाला ,मंगळवार १७ सप्टेंबर रोजी रुक्मिणी स्वयंवर ,बुधवार १८ सप्टेंबर रोजी सुदामाचे पोहे,१९ सप्टेंबर गुरुवार रोजी गोकर्ण कथा व कथेची पूर्णाहुती असून याच दिवशी गोकर्ण कथा सकाळी आठ ते दहा या वेळात होईल. महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत असून दिंडी सोहळा संध्याकाळी पाच वाजता आहे.

    तरी सर्व भाविक भक्तांनी कथा श्रवणासाठी व दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी ,शास्त्री स्वामी धर्म किशोर दासजी ,स्वामी लक्ष्मीनारायण दासजी, सत्यप्रकाश स्वामी ,समस्त विश्वस्त मंडळ ,समस्त सत्संग समाज, महिला मंडळ व युवा मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.