Header Ads

Header ADS

सावदा येथिल संभाजी गणेश मंडळातर्फे पत्रकार बांधवांचे हस्ते सामुहीक आरती व पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरव

  

पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरव

सावदा येथिल संभाजी गणेश मंडळातर्फे पत्रकार बांधवांचे हस्ते सामुहीक आरती व पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरव

लेवाजगत न्यूज सावदा-सावदा येथिल संभाजी चौकातील मानाचा गणपती श्री संभाजी गणेश मित्र मंडळा तर्फे दिनांक १५ सप्टेंबर रविवार रोजी रात्री ८ वाजता सावदा शहर व परीसरातील समस्त पत्रकार बांधवांचे हस्ते सामुहीक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. वेळी मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते गणरायाची सामुहीक आरती संपन्न झाली.




   या वेळी मंडळाचे सर्वेसर्वा व सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा ऐके काळी लोकमत चे धडाडीचे कणखर पत्रकार म्हणून सर्वश्रुत ओळख प्राप्त असलेल जाणकार नेतृत्व राजेश भाऊ वानखेडे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व  उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे यथोचित कार्याची उपस्थित भाविकांना ओळख करून दिली.

 संभाजी गणेश मित्र मंडळातर्फे मान चिन्ह देऊन पत्रकारांचा सन्मान सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या मनात भारावून गेले की आज आपल्या कार्याची जाण सावद्यातील संभाजी गणेश मंडळांनी घेतली. या वेळी जेष्ठ पत्रकार लेवाजगत चे संपादक माजी नगरसेवक शाम पाटील,लोकमत पत्रकार राजेन्द्र भारंबे,इंडिया न्यूज रिपोर्टर प्राध्यापक राजेन्द्र चौधरी ,लाईव्ह ट्रेड न्युज पत्रकार पिन्टू कुलकर्णी ,आवाज परिवर्तन चा वृत्तपत्राचे संपादक ,सम्राट चे पत्रकार आत्माराम तायडे सर,बनाना परिसर चे संपादक पंकज पाटील लोकशाही प्रतिनिधी प्रदिप कुलकर्णी,दिव्यामराठी प्रतिनिधी राज चौधरी ,आव्हान पत्रकार राजेश पाटील,जळगांव वृत्त पत्रकार शेख साजिद ,दीपक श्रावगे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. या वेळी माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे , नगरसेविका रेखा वानखेडे, सिमरन वानखेडे,शुभम वानखेडे,प्रसाद वानखेडे,शुभम अकोले,तांबटकर, चौधरी व मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते याच सोबत बाळा भाऊ गडे  रमेश श्रावगे व समस्त गणेश भक्तांची या वेळी उपस्थिती मोठ्या संख्येने  होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.