Header Ads

Header ADS

सप्तश्रुंगी गड आज पासून चार दिवस दररोज पाच तास वाहतूक बंद राहील ;घाटामध्ये सुरक्षेसाठी जाळ्या ठोकण्यास प्रारंभ

Saptashrungi-Fort-from-today-for-four-days-every-day-for-five-hours-traffic-will-be-closed-for-safety-netting-started-in-the-ghat.

सप्तश्रुंगी गड आज पासून चार दिवस दररोज पाच तास वाहतूक बंद राहील ;घाटामध्ये सुरक्षेसाठी जाळ्या ठोकण्यास प्रारंभ

लेवाजगत न्यूज सप्तशृंगी गड-सप्तशृंग गडावर जाणाऱ्या नांदुरी ते गड या घाटरस्त्यावरील डोंगरांच्या दरडी कोसळून अपघात होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने ढिले झालेले दगड पाडून जाळ्या ठोकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी आजपासून (दि. २३ ते २६ सप्टेंबर) चार दिवस दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळात सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली आहे.

नवरात्रोत्सवाच्या आढावा बैठकीत चर्चा अन् विविध विषयांवर काम करण्याचा निर्णय झाला. नवरात्रोत्सव दि. ३ ते १२ ऑक्टोबर तसेच कोजागरी पौर्णिमा दि. १६ व १७ या कालावधीत होत आहे. त्यादृष्टीने कामे हाती घेतली जात आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळवण, नाशिक यांनी नांदुरी ते सप्तशृंगगड या रस्त्यावरील दरड प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत सुरू केलेल्या कामात व्यत्यय येऊ नये किंवा भाविकांना इजा पोहोचू नये यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गातील डोंगरावरील सैल, ढिले झालेले मोठमोठे धोकेदायक खडक व काटेरी झुडपे काढण्याचे काम सुरू झाले आहे. जाळ्या बसविण्याचे तसेच बॅरिअरचे काम या वेळेत केले जाणार आहे. भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी येताना ही वेळ टाळून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.