Header Ads

Header ADS

रणगांव येथील जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम कधीसुरू होणार ?रणगांव सरपंच संदीप कोळी यांची मागणी

 

रणगांव सरपंच संदीप कोळी यांची मागणी

रणगांव येथील जलजिवन मिशन अंतर्गत  पाणीपुरवठा योजनेचे काम कधीसुरू होणार ?-रणगांव सरपंच संदीप कोळी यांची मागणी

तासखेडा ता.रावेर प्रतिनिधी -रणगांव सह तासखेडा गहुखेडा रायपूर आणि सुदगांव  या गावांना रणगांव आणि गहुखेडा या दोन्ही गावांच्या मध्ये एकसामुहीक पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत होती त्या योजनेला जवळ पास ३५ वर्षे झाले असल्याने ती योजना जिर्ण अवस्था झाल्यामुळे गेल्या १० ते १५ वर्षा पासून बंद आहे .गेल्या १० वर्षा पासून पाच ही गावांना तापीनदीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे . त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

    गेल्या बऱ्याच दिवसापासून जलजिवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये पाईपलाईन आणि फिल्टर प्लॅन पाण्याची टाकी प्रत्येक गावाला मंजूर झाली असून पाण्याच्या टाक्या बाधकाम करण्यास ठेकेदार बुद्धी पुरस्कर काम करीत नसल्याने ग्रामस्थांना अशुद्धपाणी प्यावे लागत आहे.त्यामुळे ग्रामस्थांना अनेक साथीचे रोग व  आजारांना सामोरे जावे लागत आहे.

    रणगांव च्या पाण्याची टाकीचे खोदकाम करून बरेच दिवस झाले आहे, पण बांधकाम  करणे गरजेचे आहे.  तेथील बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे . त्या ठिकाणावर रेती ऐवजी घेसु टाकण्यात आली असून संबंधीतांनी प्रत्यक्ष कामावर येऊन ठेकेदाराची चौकशी करावी व संपूर्ण काम इस्टीमेंट नुसार करावे अशी रणगांव सरपंच संदीप कोळी यांची अपेक्षा आहे . 

    जर कामात निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्यास काम पूर्ण होऊ देणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले कारण पाणीटाकी बांधकाम हे वेळो वेळी होत नाही.असे आमच्या पतिनिधीशी बोलतांना सरपंचासह ग्रामस्थ  गावतील पदाधिकारी यांनी बोलतांना सांगितले . या कडे लोकप्रतिनिधीयांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे . असे परिसरातून बोलले जात आहे . या कडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का या कडे ग्रामस्यांचे लक्ष लागले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.