Header Ads

Header ADS

पोर्‍ही-तेव्हाच्या आताच्या-काशिनाथ भारंबे

 

पोर्‍ही-तेव्हाच्या आताच्या-काशिनाथ भारंबे

पोर्‍ही-तेव्हाच्या आताच्या-काशिनाथ भारंबे


मी शिकायचो शाळा तेव्हा माझ्याही वर्गात होत्या की शिकत पोरी सगळ्याच काही नव्हत्या तिरळ्या ,की नकट्या चपट्या बसक्या नाकाच्या  , 

पण  होत्या साऱ्याच साजिऱ्या गोजि-या  नाकी डोळी भुलवणाऱ्या , 


आम्ही पो-हं घालायचो सदरा 

बांड्या बाह्यांचा पांढरा  , 

अन् चड्डी हाप खाकी  , 

तो काळच होता पोरींसाठी 

परकर झंपर नेसायचा 

दिवस असो की रात्र काळी  , 


मला नाही आठवत की 

छेडलं असेल कुणा पोरानं

बसून चौकात रस्त्या किनारी 

करून विनोद आचकट पाचकट  , 


हो , व्हायची की देवाण-घेवाण 

देउन घेऊन वह्या पुस्तकं एकमेकांची

पण ठेवलेली नसायची त्यात 

चिठ्ठी चपाटी अन् चित्रं अश्लील काढलेली  , 

अन् बाण तिरपेतारपे मारुन 

हिचं नांव तिला अन् तिचं हिला दिलेली , 


हां , दिसलंच कुणाच्या वहीत

एखादं मोरपीस तर मागितलं जायचं - ' ये मला दे की ' म्हणत कौतुक करत , 


आताच्या पोरां पोरींवषयी तर  विचारूच नका , न सांगितलेलंच बरं , 

असो दिवस की असो रात्र काळी 

असो घरी वा शाळेत वा गांव बाजारी स्पर्धाच लागलीय छाती पोट उघडं टाकून हिंडायची फॅशनच्या नांवाखाली कळत नाही , 

उघडं नागडं फिरायची ही फॅशन भारतात आली कुठून , 

मला छळत असतो हा प्रश्न दिवसरात

की हिंडू तरी कसे देतात पालक त्यांचे शिकलेले जबाबदार नागरिक असून ! 

  काशिनाथ भारंबे " निर्मोही " तळेले काॅलनी -खडका रोड भुसावळ .मोबा 9272303212

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.