Header Ads

Header ADS

सावदा:प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणास दुसऱ्या तरुणांनी डोक्यात हातोडा मारून केले गंभीर जखमी

 

One-youth-is-seriously-injured-by-another-youth-hit-on-the-head-with-a-hammer-on-suspicion-of-having-a-love-relationship

सावदा :प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणास दुसऱ्या तरुणांनी डोक्यात हातोडा मारून केले गंभीर जखमी 

 लेवा जगत न्यूज सावदा:-तालुका रावेर येथील बडा आखाडा भागातील रहिवासी मोईन सैय्यद सलीम हा सार्वजनिक कार्यक्रमात जेवण करीत असताना हैदर शेख मंजूर तरुण रागा रागाने जेवणाऱ्या तरुणाकडे बघत होता ,येऊन त्याने त्याच्या डोक्यात लोखंडे हातोळा मारून जखमी केले. मोईन सैय्यद सलीम यांच्या जबाबवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गंभीर जखमी तरुणावर भुसावळ येथे उपचार सुरू आहे. 

ही बातमी पण बघा-सावदा येथे हिंदू मुस्लिम समाज एकात्मतेचे कार्य करणाऱ्या गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा गौरव-चांदणी चौक मुस्लिम नवजवान फाऊंडेशन उपक्रम

https://youtu.be/RFZvU-SeaFQ


    याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद मोईन सैय्यद सलीम( वय २४) रा. बडाआखाडा सावदा ता. रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. बुधवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री साडे सात ते ८ वाजेच्या दरम्यान बाजारपट्टा भागात सामुहिक जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा सैय्यद मोईन हा देखील आलेला होता. त्यावेळी हैदर शेख मंजूर हा देखील त्या कार्यक्रमात आलेला होता. दरम्यान हैदर शेख मंजूर याने सैय्यद मोईन याच्याकडे कारण नसतांना  रागाने पाहुन गेला व त्यानंतर पुन्हा आरोपी हा त्याचे हातात हातोडा (घन) घेवून आला व फिर्यादी आरोपीतास पाहुन तो मारेल या भितीने पळून जात असतांना आरोपीने फिर्यादीचे डोक्यावर मागील बाजुस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारून गंभीर जखमी केले.ही घटना प्रेम संबंध असल्याचा संशय व मागील भांडण या कारणाने झाल्याचे म्हटले आहे नोंदीत म्हटले आहे.जखमी तरुणावर भुसावळ येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.    

    याप्रकरणी सैय्यद मोईन याने दिलेल्या फिर्यादीवरून हैदर शेख मंजूर रा. बडाआखाडा सावदा ता. रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला रात्रीच मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल सानप हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.