Header Ads

Header ADS

वरणगाव फॅक्टरीच्या क्वॉर्टरमध्ये पर्यवेक्षकाचा खून

 

Murder of supervisor in Varangaon factory quarters

वरणगाव फॅक्टरीच्या क्वॉर्टरमध्ये पर्यवेक्षकाचा खून

लेवाजगत न्यूज वरणगाव-वरणगाव फॅक्टरीच्या क्वॉर्टरमध्ये एका कर्मचाऱ्याचा निघृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली.याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

लेवाजगत


 वरणगाव फॅक्टरीत पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४४) हे बुधवारी दुपारी जेवणासाठी त्यांच्या कर्मचारी निवासस्थानी आले होते. १.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता प्रदीप इंगळे हे मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, सुशील सोनवणे, पोहेकॉ. संदीप बनसोडे, सुखराम सावकारे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पाहणी करून तिन संशयितांना ताब्यात घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.