Header Ads

Header ADS

मिरवणुकीतील डीजेच्या कर्कश आवाजाने एकाचा मृत्यू तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु


 मिरवणुकीतील डीजेच्या कर्कश आवाजाने एकाचा मृत्यू तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु


लेवाजगत न्युज परभणी:-

जिंतूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजेच्या आवाजाने मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याची घटना घडली आहे. अस्वस्थ झालेल्या तिघा जणांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवाजाच्या डिसेबलची मर्यादा सुप्रीम कोर्टाने कितीही घालून दिली असली तरी प्रत्येकवेळी पोलीस प्रशासन याचकडे दुर्लक्ष करत असल्याने दरवेळेस जिल्ह्यात मिरवणुकी दरम्यान एकाला तरी आपला जीव गमवावा लागतो.


याविषयी विस्तृत माहिती अशी की, परभणीच्या जिंतूर शहरात आज गणेश विसर्जन मिरवणूक थाटामाटात सुरू होती. मिरवणुकीत चार मंडळांनी डीजे लावले होते. या चार पैकी एका मंडळांनी आणलेल्या डीजेवरील कर्कश आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफन नाचत होते. रात्री ८.३० च्या दरम्यान ही मिरवणूक जिंतूरच्या पोलीस स्टेशन परिसरात आली.

डीजेच्या तालावर तरुण युवक चांगलेच नाचत होते. नाचत असतानाच त्यातील संदीप विश्वनाथ कदम हा तेथेच चक्कर येऊन पडला. त्याच्यासोबत अन्य तिघांच्याही छातीमध्ये दुखू लागले. संदीप कदम याला तात्काळ जिंतूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण संदीप कदम यांचा जागीच मृत्यू झाला होता.


याच मिरवणुकी दरम्यान शिवाजी कदम शुभम कदम आणि गोविंद कदम या तिघांच्याही छातीत दुखू लागले. या तिघांना सर्वप्रथम जिंतूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण या तिघांची ही परिस्थिती अस्वस्थ असल्याने तिघांनाही परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तिघांवर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


धार्मिक कार्यक्रम असो किंवा मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करू नये असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही, या आदेशाची पायमल्ली मात्र पोलीस प्रशासन असो किंवा आयोजक हे सर्रास पणे करत असतात. त्यामुळे दरवर्षी जयंतीची मिरवणूक असो किंवा गणेश विसर्जन असो यादरम्यान कोणाला ना कोणाला तरी आपला प्राण गमवावा 

लागतो . पण याकडे मात्र पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. जिंतूर ची घटना तर पोलीस ठाणे समोरच घडली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.