Header Ads

Header ADS

स्थानिक एज्युकेशन सोसायटी शिंदी या संस्थेच्या वतीने शिक्षकांचा ऐतिहासिक सन्मान

Local-Education-Society-Shindi-Historical-Honoring-Teachers-On-Behalf-of-Organization


स्थानिक एज्युकेशन सोसायटी शिंदी या संस्थेच्या वतीने शिक्षकांचा ऐतिहासिक सन्मान

लेवाजगत न्यूज शिंदी-स्थानिक एज्युकेशन सोसायटी शिंदी या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा, श्रीकृष्ण हायस्कूल, या तिन्ही शाळांमधील शिक्षकांचा प्रथमच ऐतिहासिक सन्मान.

५ सप्टेंबर  शिक्षक दिनी स्थानिक एज्युकेशन सोसायटी श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी या विश्वस्त कार्यकारी मंडळाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी, उर्दू शाळा,श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी मधील सर्व शिक्षकांचा एक छोटीशी भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वीरेंद्र कोल्हे यांनी भूषविले. या सत्कार समारंभाच्या वेळी स्थानिक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कोल्हे, उपाध्यक्ष प्रवीण नेमाडे, सचिव सुभाष कोल्हे, विश्वस्त शरद ढाके, पांडुरंग नेहेते, ऋषिकेश महाजन, विशाल कोल्हे, महेंद्र कोल्हे शाळेचे मुख्याध्यापक भास्कर वारके आणि तिन्ही शाळांमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

      संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंत संस्थेच्या इतिहासामध्ये तिन्ही शाळांमधील शिक्षकांचा असा एकत्रित सन्मान करण्यात आला नव्हता. म्हणून शिक्षकांनी संस्थेच्या इतिहासात प्रथमच शिक्षकांचा ऐतिहासिक सन्मान करण्यात आला अशी शिक्षकांनी भावना व्यक्त केली.

यावेळी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणांमधून आपले मनोगत व्यक्त केले.

 शिक्षकांमधून विजय नेहते  आणि मनोगतात समाधान जाधव यांनी सत्कार केल्याबद्दल सर्व शिक्षक बंधू भगिनी स्थानिक एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे कायम ऋणी आहोत. आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही आपणास शुभेच्छा देतो आणि आपला संस्थेस आम्ही आमच्या परीने वेळोवेळी मदत सहकार्य करण्यास नेहमी तत्पर राहू.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक गोकुळसिंग राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन आर डी महाजन यांनी केले. शिक्षकांमधून मनोगत उपशिक्षक विजय नेते आणि आदर्श शिक्षक समाधान जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. शाळेमध्ये प्रथमच तिन्ही शाळांमधील शिक्षकांचा गौरव झाला. त्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांनी संस्थेची प्रशंसा केली. ग्रामस्थ यांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.