Header Ads

Header ADS

खिर्डी खुर्द येथिल एस.पी.राणे विद्यालयात सायबर क्राईम,सोशल मिडियाचा वापर,महिला सुरक्षा जनजागृती सभा

 

Khirdi-Khurd-Yethil-S-P-Rane- Use-of-Cyber-Crime-Social-Media-in-School-Women-Security-Awareness-Meeting

खिर्डी खुर्द येथिल एस.पी.राणे विद्यालयात सायबर  क्राईम,सोशल मिडियाचा वापर,महिला सुरक्षा जनजागृती सभा 

लेवाजगत न्यूज खर्डी -विद्या विकास मंडळ खिर्डी खुर्द संचलीत एस पी राणे विद्यालय  खिर्डी खुर्द येथे निंभोरा पोलिस स्टेशन चे स.पो.नी हरिदास बोचरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर  क्राईम जनजागृतिचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एस.भंगाळे यांनी  बोचरे  यांचे स्वागत केले .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करा.शिक्षण हेच यशाचे  खरे साधन आहे,महिलांवर होणारे छळ, अत्याचारी लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यालय विद्यार्थ्यांना  केले.प्रस्तुत कार्यक्रमासाठी गोपनीय पोलीस अधिकारी अमोल वाघ विद्यालयातील शिक्षक  रतन भोई,जयदीप फेगडे ,उल्हास बंड,गणेश पाटील,शरिफ तडवी, ईश्वर महाजन,जयश्री ,हर्षदा,नयना ,लक्ष्मी ,योगिता चौधरी  ,दिलीप किरन्गे  विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष पाटील व आभार योगेश नेरकर  यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रविण अवसरमल,शेखर भंगाळे,रितेश लढे यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.