Header Ads

Header ADS

केऱ्हाळे उर्दू शाळेत डॉ.अरुणा चौधरी यांच्या हस्ते संस्कार गीत पुस्तकाचे वितरण

 

Kēṟhāḷē-urdū-śāḷēta-ḍŏ-aruṇā-caudharī-yān̄cyā-hastē-sanskāra-gīta-pustakācē-vitaraṇa

           


केऱ्हाळे उर्दू शाळेत डॉ.अरुणा चौधरी यांच्या हस्ते संस्कार गीत पुस्तकाचे वितरण

 लेवाजगत न्यूज सावदा -रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे सन्माननीय शिरीष दादा चौधरी आमदार रावेर विधानसभा क्षेत्र यांचे परिवारातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संस्कार गीत पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी उर्दू शाळेत डॉक्टर अरुणाताई शिरीष चौधरी , पोलीस पाटील सन्माननीय वर्षा प्रवीण पाटील , ग्रामपंचायत सदस्या ऐनुर मुनाफ तडवी,  पंचायत समितीचे माजी सदस्या जुगरा मेहबूब तडवी , उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीत तडवी , शाळेचे मुख्याध्यापक गौस खान , उपशिक्षक शकील तडवी ,  उन्नती ताई ,  नीलिमाताई व ग्रामस्थ उपस्थित होते.डॉक्टर अरुणाताई चौधरी यांनी मुलांना सखोल असे मार्गदर्शन केले.उन्नती ताई चौधरी यांनी मुलांना एक छान गीत गायन करून दाखविले.

*वरणगाव फॅक्टरीच्या क्वॉर्टरमध्ये पर्यवेक्षकाचा खून >>* https://www.lewajagat.com/2024/09/Murder-of-supervisor-in-Varangaon-factory-quarters.html


    कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने शाळेतील विद्यार्थिनी सादियाबी अमिन शाह  व नात पठण फातिमा जुम्मा तडवी यांनी केले .प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गौस खान यांनी सादर केले. सर्वप्रथम शाल व पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे स्वागत  करण्यात आले .मधुस्नेह परिवारातर्फे शाळेतील शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाल पुष्पगुच्छ पेन भेट देवून  सन्मानित करण्यात आले.

    सुत्रसंचालन शिक्षक शकील तडवी यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.