Header Ads

Header ADS

जे.टी.महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे इंजिनिअर डे उत्साहात साजरा

 

JT-Mahajan-Polytechnic-Faizpur-Celebrates-Engineers-Day-with-enthusiasm

जे.टी.महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे इंजिनिअर डे उत्साहात साजरा 

लेवाजगत न्यूज फैजपूर- न्हावी मार्ग जिवराम नगर फैजपूर येथिल टेक्निकल आणि मेडिकल एज्युकेशन सोसायटी संचलित जे. टि.महाजन पॉलीटेक्निक येथे दिनांक १५ सप्टेंबर रोजी इंजिनिअर डे साजरा करण्यात आला. 




  आधुनिक भारताचे विश्वकर्मा भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त इंजिनिअर डे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल जीवन कार्याची माहिती दिली. 

  यावेळी प्राचार्य पी.एम. राणे यांनी  विद्यार्थ्यांना  इंजिनियरचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमाचे शेवटी सूत्रसंचालन कु. वैभवी बढे हिने केले तर आभार प्रदर्शन ओम महाजन या विद्यार्थ्याने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.