Header Ads

Header ADS

भारतीय सैन्याच्या विशेष ट्रेनला बॉम्बने उडवण्याचा कट उघडकिस

 

Indian-Army-Special-Train-Bombing-Clot-Uncovered

भारतीय सैन्याच्या विशेष ट्रेनला बॉम्बने उडवण्याचा कट उघडकिस

 लेवाजगत न्यूज भुसावळ दि-२१-९-२०२४-भारतीय सैन्याच्या विशेष ट्रेनला डिटोनेटर बॉम्बने उडवण्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील नेपानगर रेल्वे रूळालगत उघडकिस आल्याने भुसावळ रेल्वे विभागासह देशात मोठी खळबळ उडाली आहे. या घटना नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा सतर्क झालेल्या असून त्या नेपानगर येथे दाखल झालेल्या आहेत.

हा व्हिडीओ बघा-भुसावळ रेल्वे विभागात भारतीय सैन्याची विशेष रेल्वे उडवण्याचा कट उघडकिस राष्ट्रीय तपास यंत्रणा सतर्क

https://youtu.be/eGVL6eFzcFg

  याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर रेल्वे स्थानका जवळील रुळालगत दहा डिटोनेटर बॉम्ब लावून लष्कराची ट्रेन बॉम्बने उडवण्याचा कट दिनांक १८ सप्टेंबर रोजी उघडकीस आलेला आहे. लष्कराची विशेष ट्रेन पोहोचण्या आधीच संबंधित विभागातील अधिकारी अलर्ट झालेले होते. ही विशेष ट्रेन काश्मीरहून कन्याकुमारी येथे जात होती. 

    रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या ट्रेनला सागफाटा या स्थानकावर थांबवण्यात आले होते. यामध्ये सुदैवाने मोठी दुर्घटना व जीवित हानी टळलेली आहे. या ठिकाणी तात्काळ मुंबई येथील राष्ट्रीय तपास संस्थेची टीम दाखल झालेली असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे स्फोट झालेले डिटोनेटर रेल्वे वापरत असलेल्या स्फोटकांशी मिळतेजुळते असल्याची प्राथमिक माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख डॉक्टर स्वप्निल निला यांनी दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.