Header Ads

Header ADS

कोणाला खाज जास्त वाटत असेल तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत-जनार्दन हरी जी महाराज पाल येथील हारिधाम मंदिरासमोरील घटनेच्या निषेधार्थ संत,चैतन्य साधक व सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश सभा

https://youtu.be/YPD6anuIlzw


कोणाला खाज जास्त वाटत असेल तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत-जनार्दन हरी जी महाराज

 पाल येथील हारिधाम मंदिरासमोरील घटनेच्या निषेधार्थ संत,चैतन्य साधक व सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश सभा

लेवाजगत न्यूज पाल :- सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी क्षेत्रात  वसलेले पाल या गावात अध्यात्मिक गंगेचे भगीरथ परम पूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजिंनी देशभरातील लाखो भाविकांना एकसुत्रात बांधून भक्तांच्या हृदयात जी भक्तीची ज्योत पेटवून आचार विचार व व्यसन मुक्त,शुद्ध शाकाहारी जीवन जगण्याची कला अवगत करून दिली.परंतु त्यांच्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात असलेल्या श्री हरिधाम मंदिरासमोर च्या तलाव परिसर रस्त्यावर काही समाज विरोधी का कडून गैरकृत्य करतांना चे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करून कट रचण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर कार्यवाही व्हावी या करिता दि २१ सप्टेंबर रोजी पाल येथे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार,संत समाज व सकल हिंदू समाजातर्फे भव्य जनआक्रोष सभेचे आयोजन करून प्रशासनास जागृत करण्यात आले.

हा व्हिडीओ संपूर्ण बघा संतांचा आक्रोश-आम्ही इतर धर्माचा आदर करतो पण आम्हाला डीचवण्याचा प्रयत्न कोणी करू नये अन्यथा..- जनार्दन हरीजी महाराज

     या सभेत अध्यक्षीय संभासणात महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी प्रशासनाला सदर दोषींवर कार्यवाही करावी जेणेकरून असा प्रकार परत घडणार नाही जर तुम्ही या कार्यवाहित दिरंगाई करतांना दिसून आले तर आम्हाला पुढील मार्ग शोधावे लागेल व जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले. आम्ही इतर धर्माचा आदर करतो आमचाही आदर करावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील .कोणाला खाज जास्त वाटत असेल तर त्यालाही आम्ही संत तयार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.संत प्रथमच आक्रमक.
       त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी कोणत्याही धर्मा विषयी विटंबना केल्यास त्यांचे परिणाम भोगावे लागतील. व या घटनेच्या आरोपींवर व संशयी तावर कार्यवाही केली जाणार अशी ग्वाही दिली.
      या सभेत अखिल भारतीय संत समिती चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष फैजपूर येथील महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज,आचार्य श्री मानेकर बाबा,धुळे येथील श्री योगी दत्तनाथ महाराज,झिरण्या मध्यप्रदेश चे श्री राघवानंद भारती जी महाराज,जामनेर येथील श्री श्याम चैतन्य जी महाराज, जिन्सी साबरपाट चे श्री परमानंद जी महाराज,बुऱ्हाणपूर येथील श्री करण पुरी जी महाराज,फैजपूर येथील श्री पवन कुमार दास,सावदा येथील अनंत प्रकाश दासजी,कोठारी स्वयंप्रकाश दासजी पाल येथील श्री दिव्य चैतन्य जी महाराज,शिव चैतन्य जी , ब्रज चैतन्य जी ,नवनीत चैतन्य जी,राधे चैतन्य जी, सर्व चैतन्य जी,ललित चैतन्य जी,रामशरण चैतन्य,ऋषी चैतन्य जी,शुभ चैतन्य जी,महाराज आदी सह हजारो च्यां संख्येने चैतन्य साधक व सकल हिंदू समाज उपस्थित होते.
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.