Header Ads

Header ADS

माझ्या मुलीला मी नदीत फेकून देईल,जी बापाची झाली नाही ती लोकांची काय होणार?-मंत्री धर्मरावबाबा आत्राम

 

I will-throw-my-daughter-in-the-river-who-did-not-become-father-what-will-happen-to-the-people-Minister- Dharmaraobaba-Atram

माझ्या मुलीला मी नदीत फेकून देईल,जी बापाची झाली नाही ती लोकांची काय होणार?-मंत्री धर्मरावबाबा आत्राम 

वृतसंस्था चंद्रपूर -एक मुलगी गेली तरी चालेल. माझ्याकडे आणखी एक मुलगी व मुलगा आहे. जी बापाची झाली नाही ती लोकांची काय होणार? शरद पवार यांच्या संपर्कात असलेल्या माझ्या मुलीला मी नदीत फेकून देईल, असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले.

  धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री हलगेकर या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उरणार असल्याची चर्चा आहे. त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातूनच आपल्या वडिलांना आव्हान देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी उपरोक्त विधान केले आहे.

   धर्मरावबाबा आत्राम या प्रकरणी आपल्या मुलीसह शरद पवारांवर टीकेची झोड उठवत म्हणाले की, एक पक्ष फोडाफोडी करण्यात तरबेज आहे. तो आता माझे घर फोडण्याचे काम करत आहे. हरकत नाही. माझी एक मुलगी गेली तरी चालेल. मला आणखी एक मुलगी व मुलगा आहे. जी मुलगी बापाची झाली नाही, ती तुमची कशी होईल? माझ्याकडे दुधारी तलवार आहे. कुणी माझ्या वाटेला गेले तर ती मी म्यानेतून बाहेर काढेन. आता आमचे घराणे हलगेकरांना (भाग्यश्री) नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही.

  माझ्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवणाऱ्यांना मी बाजूला सारणार. मी या भूमीवरील सर्वच गरीब, श्रीमंत यांना कोणत्याही भेदभावाविना न्याय दिला आहे. मागील 50 वर्षांपासून हे काम सुरू आहे. आता मध्येच येऊन हे लोक असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावण्याचे काम मी करेल. एक जण गेला तरी संपूर्ण कुटुंबाची फौज माझ्यामागे उभी आहे, असेही धर्मरावबाबा आत्राम यावेळी बोलताना म्हणाले.

  दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अहेरी येथील जनसन्मान यात्रेत बोलताना भाग्यश्री यांना आपल्या वडिलांसोबतच राहण्याचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आज बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळे शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका. बापासोबत राहा.

बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. त्यामुळे घरामध्ये फूट पाडण्याचे काम करू नका. हे बरोबर नाही. समाजालाही हे आवडत नाही. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. मी माझी चूक मान्यही केली आहे. मात्र आता माझे सांगणे आहे की, वस्तादने एक डाव राखून ठेवला आहे. तो डाव खेळण्याची वेळ त्यांच्यावर आणू नका, असे अजित पवार म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.