Header Ads

Header ADS

पैसे उकळणाऱ्यांपासून डॉक्टरांना संरक्षणाची गरज-उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता डॉ प्रशांत अहिरे डॉक्टर निर्दोष

High Court-expresses-concerns-need-to-protect-doctors-from-money-launderers

डॉ प्रशांत अहिरे निर्दोष 

उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता- पैसे उकळणाऱ्यांपासून डॉक्टरांना संरक्षणाची गरज 

लेवा जगत न्यूज सावदा- नुकसानभरपाई मिळवण्याच्या उद्देशाने म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांवर बोगस खटले दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे, असे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील डॉक्टरांवरील वैद्यकीय निष्काळजीपणाचा खटला रद्द करताना म्हटले आहे.

    डॉ. प्रशांत अहिरे यांनी १३ ते १६ मे २०२१ या कालावधीत गायत्री पाटील यांच्यावर उपचार केले. त्यानंतर गायत्री यांची प्रकृती खालावली. नंतर त्यांच्यावर तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले,

    पण १ जून २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर अहिरे यांनी चुकीचे उपचार केल्याने गायत्री यांचा जीव गेला, असा आरोप पतीने केला. चौकशीसाठी डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२२ च्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात डॉ. अहिरे यांनी आयुर्वेदिक डॉक्टर असूनही अॅलोपॅथी औषधांचे 'अतार्किक डोस' दिल्याचे म्हटले.

   वैद्यक व्यावसायिकांविरुद्ध खटले वाढले आहेत.

    अन्यायकारक खटल्यापासून डॉक्टरांचे संरक्षण आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा ते भरपाई मिळविण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी दाखल केले जातात.- न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि संतोष चपळगावकर

           डॉक्टर निर्दोषच

      डॉ. अहिरेंविरुद्ध कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आयपीसीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.

     डॉ. अहिरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने खटला रद्द करताना डॉ. अहिरे यांची भूमिका पहिल्या चार दिवसांच्या उपचारापुरती मर्यादित असल्याचे नमूद केले.

      उपचाराच्या कागदपत्रांवरून मेंदूत रक्तस्राव झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तज्ज्ञ समितीच्या अहवालात मेंदूतील रक्तस्राव आणि गायत्री यांच्या मृत्यूसाठी औषधांचे अतार्किक डोस कारणीभूत होते, असे कुठेही म्हटलेले नाही, असे निरीक्षण नोंदवले.

       गुजरात हायकोर्टानेही रोगनिदान चुकण्याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असा निर्णय दिला आहे.

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.