Header Ads

Header ADS

अमळनेर येथे २८ वर्षीय महिलेचा निघृण खून !

Heinous murder of 28-year-old woman in Amalner!


अमळनेर येथे २८ वर्षीय महिलेचा निघृण खून !

लेवाजगत न्यूज अमळनेर:- अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्ह्याचा शोध घेण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

   याबाबत अमळनेर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. शीतल जय घोगले वय २८ रा. गांधलीपूरा, अमळनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

  अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागातील एका मोकळ्या जागेच्या आवारात शीतल घोगले या महिला मृतदेह रविवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आढळून आला. तिच्या गळ्याला आवळल्याचे व्रण असून डोक्याला व हातावर वार केल्याचे दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्यासह अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आला.


 हा खून नेमका कुणी व कोणत्या कारणासाठी केला आहे याची माहिती मिळालेली नाही. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, संदीप पाटील यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.