Header Ads

Header ADS

कृतज्ञता संवाद दौरा निम्मित मोहमांडली,तिड्या,अंधारमळी गावात नागरिकांच्या धनंजय चौधरी यांनी जाणून घेतल्या समस्या

 

Gratitude-dialogue-tour-in- Mohmandali-Tidya-Andharamali-village-problems-known-by-citizens-Dhananjay-Chaudhary


कृतज्ञता संवाद दौरा निम्मित मोहमांडली,तिड्या,अंधारमळी गावात नागरिकांच्या धनंजय चौधरी यांनी जाणून घेतल्या समस्या 

लेवाजगत न्यूज मोहमांडली दि.3 - कृतज्ञता संवाद दौरा मोहमांडली,तिड्या,अंधारमळी या गावांना भेट देत तेथील समस्या आणि आगामी विकासकामे या बद्दल विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनात युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांनी जाणून घेतल्या. यावेळी मोहमांडली गावातील विहिरीचे जलपूजन श्रीफळ फोडून सरपंच मुस्तफा तडवी ,रमजान गेंदा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रतिष्ठित व्यक्ती शहाबीर तडवी,नसीर तडवी,जग्गू तडवी,बशीर तडवी,ईदबार तडवी,मुबारक तडवी युवा मंडळी नेहारा तडवी,नासिर मोहम्मद,मेहरबान तडवी नासिर बशीर तडवी,बाबू तडवी हे उपस्थित होते. तिडया ग्रामपंचायत मेंबर शब्बीर नुरखा तडवी सलीम तडवी  यांच्या हस्ते विहिरीचे जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील मंडळी अब्दुल फत्रू तडवी,अझरुद्दीन रमजान इस्माईल, जावेद फौजी ,जुमा नूरखा गफुर,मोहम्मद राईस संजू,एजाज रेहमान हे उपस्थित होते. अंधारमळी ग्रामपंचायत सदस्य सलीम शामत तडवी,जुम्मा निजाम,बीराम तडवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील वरिष्ठ मंडळी कादर तडवी,समीर तडवी,अहमद तडवी, भिकारी तडवी ,तसलीम तडवी, हमित तडवी उपस्थित होते.





मोहमांडली गावात सन १९८४ साली कैलासवासी मधुकरराव चौधरी यांनी सर्वप्रथम या गावासाठी बससेवा सुरू केली.                            

   तसेच प्रथम विज या गावासाठी आणून सहकारास चालना दिली.या गावी १९९४ साली प्राथमिक आश्रम शाळा तसेच २००४ साली माध्यमिक आश्रम शाळा सुरू केली. मोहमाडली गावासाठी गावांसाठी मा.आ. शिरिष दादा यांनी यांनी पेवर ब्लॉक,सिमेंट रस्ते,गटारी या कामांसाठी जवळ जवळ ४० लाख रुपयाचा निधी दिला आहे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईन साठी सुद्धा निधि उपलब्ध करून दिलेला आहे . गावाची लोकसंख्या ११०० एवढी एवढी असून सुद्धा माननीय आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांच्या प्रयत्नातून भरघोस असा निधी गावकऱ्यास प्राप्त झालेला आहे. मोहमाडली या गावासाठी सरकारी दवाखाना बनवून दिला.या गावा सभोवती बंधारे टाकून जमिनीत पाणी जिरवण्यास महत्त्वाचे योगदान दिले आहे. अरमान इब्राहिम तडवी यांना  शस्त्रक्रियेसाठी मधुकरराव चौधरी यांनी फार पूर्वीच्या काळात मुंबई येथे व्यवस्था करून दिली होती. 

तिड्या गावात अरमान सरदार यांच्या मुलीच्या ऑपरेशनचा खर्च माध्यमिक आश्रम शाळा मांडली मार्फत करण्यात आला आहे. कैलासवासी मधुकरराव चौधरी यांच्या काळात गावात नवनवीन नाविन्यपूर्ण योजना राबवून गावासाठी वीज तसेच रस्ते बनवण्यात आले. माननीय आमदार श्री दादा चौधरी यांच्यामार्फत आमदार निधी मधून जलजीवन मिशन मार्फत पाण्याची टाकी पाईपलाईन तसेच गावांतर्गत असलेले सिमेंट रस्ते गटारी पिवर ब्लॉक असे एकूण ३० लाख रुपये निधी गावात मंजूर करून विकास कार्य केलेले आहे . सन १९७९ मध्ये कैलासवासी मधुकरराव चौधरी यांच्या काळात तीड्या गावाच्या नदीवर पाझर तलाव बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच जल पूजनास अब्दुल फत्रू तडवी ग्रामपंचायत मेंबर शब्बीर गुरखा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी सलीम तडवी,जावेद फौजी, एजाज रहमान उपस्थित होते. अंधारमळी गावासाठी आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्व जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईन काम करून देण्यात आलेले आहे. तसेच सिमेंट रस्ते गटारी पेव्हर ब्लॉक यांच्यासाठी ३० लाखापर्यंत चा निधी गावासाठी देण्यात आलेला आहे.

कृतज्ञता दौऱ्यास गावातील तरुण व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कृतज्ञता यात्रा दरम्यान गावातील ग्रामस्थ मंडळी यांच्या हस्ते गावातील विहीर व कुपनलिकेवरती जलपूजन करण्यात आले. तसेच प्रत्येक गावातील ज्या लोकांनी महत्त्वाचे पद भूषवून मयत झालेले असतील त्यांच्या नावाने एक झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.