Header Ads

Header ADS

ग्रामपंचायत सांगवी बुद्रुक तालूका यावल येथे शिक्षकदिनी शिक्षकवृदांचा कृतज्ञता सत्कार

 

Gram Panchayat-Sangvi-Budruk-Taluka-Yaval-at-Teachers-Day-Teachers-Grateful-Feed

ग्रामपंचायत सांगवी बुद्रुक तालूका यावल येथे शिक्षकदिनी शिक्षकवृदांचा कृतज्ञता सत्कार 

लेवाजगत न्यूज सांगवी बुद्रुक- ज्योती विद्या मंदीर व पदमश्री भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविधालय . शासनमान्य कै. निंबाजी दुलाजी चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ; ज्योती प्राथमिक मंदीर (इंग्रजी माध्यम) येथील शिक्षक वृंदांचा कृतज्ञता सत्कार ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालयात  केला . 

    सविस्तर वृत्त असे निमंत्रित प्रकाश मंडळ संचलित ज्योती विधामंदीर , पद्मश्री भालचंद नेमाडे कनिष्ठ महाविदयालय ; कै, निंबाजी दुलाजी चौधरी आयटीआय व जि.प प्रा.शाळा येथील शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी वृंदांना सन्मानाने शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी आमंत्रित करून शिक्षक दिनी ग्रामपंचायत सांगवी बु।। येथे सभा मंडपात बसविले . तेथे सर्वात आधी शासकीय आदेशानुसार श्री. चक्रधर स्वामी व डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन प्राचार्य ज्योती विदयामंदीर व सरपंच यांचे शुभहस्ते केले , तदनंतर कृतज्ञता पूर्वक सरपंच राशिद तडवी,उपसरपंच अतुल फिरके ,उपस्थित ग्रामपंचायतसदस्य दिपक चौधरी , विकास धांडे  आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते गुलाबपुष्प व रेनॉल्डचा जॉटरची लेखणी शिक्षक बंधु भगिनिंना देऊन गौरविण्यात आले . 

    यावेळी उपसरपंच अतुल फिरके यांनी शिक्षक वृदांविषयी कृतज्ञताभावोद्‌गार काढले ; एनसीसी शिक्षक पंकज यांनी माजी राष्ट्रपती  डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे युनेस्को द्वारे विदेशात भारतीय संस्कृति शिक्षणाची बीजे रोवण्याचे कार्य तसेच मराठी भाषेतील लीळाचरित्र या ग्रंथाचे प्रणेते तसेच महानुभाव सांप्रदायाचे संस्थापक प.पू. सदगुरु श्री चक्रधर स्वामी यांचे कार्य व महत्व विशद करून सांगितले . ज्योती विद्यामंदीर मुख्याध्यापक  भंगाळे यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे जन्मदिनी  त्यांची राजकीय कायकीर्द ५ वर्ष उपराष्ट्रपती व १० वर्ष राष्ट्रपती तसेच युनेस्को या आंतराष्ट्रीय संघटनेचे कार्य करीत असताना त्यांचे अपूर्वशैक्षणिक योगदानाची माहीतीउपस्थित मान्यवरांना दिली . नाश्ता व चहापानाने या सोहळ्याची सांगता झाली . या शुभप्रसंगी उपसरपंच यांनी आभारपर मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन विकास धांडे यांनी केले .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.