Header Ads

Header ADS

गोडस मुलगी आढळली देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात

 

गोडस मुलगी आढळली देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात

गोडस मुलगी आढळली देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात

वृतसंस्था मुंबई -येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे हैदराबादच्या लिंगमपल्लीपर्यंत धावणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात एक दीड महिन्याची चिमुकली आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारावर या बाळाच्या अज्ञात आई - वडिलांचा शोध घेत आहेत.

  यासंबंधीच्या वृत्तानुसार, अयलया बुकिया राजिया यांनी यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. देवगिरी एक्सप्रेस रविवारी तेलंगणातील लिंगमपल्ली स्टेशनवरून सुटली होती. त्यानंतर कुणीतरी तिच्या शौचालयात स्त्री जातीचे दीड महिन्यांचे बाळ ठेवून दिले. हा प्रकार रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती रेल्वेतील इतर प्रवाशांना दिली. पण कुणीही त्या बाळाची जबाबदारी घेतली नाही. अखेर या प्रकरणी मनमाड येथील रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 

या प्रकरणी टीसीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ते ८ सप्टेंबर रोजी ७ वाजेपासून ट्रेन क्रमांक १७०५८ अप लिंगमपल्ली - मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये A/1, A/2, A/3, H/1, B/4 या कोचमध्ये कर्तव्यावर होते. सदर गाडी छत्रपती संभाजीनगर येथून निघाल्यानंतर A/3 कोच मधील सीट नं ४५ वरील प्रवाशाने मला येऊन एक बाळ शौचालयालगत ठेवून देण्यात आल्याची माहिती दिली. मी तिथे जाऊन चौकशी केली असता रेल्वेच्या शौचालयात कमोडच्या शेजारी एक दीड महिन्याची बेवारस चिमुकली आढळली.

  त्यानंतर या घटनेची माहिती नांदेड येथील रेल्वे कमर्शियल कंट्रोल रुमला कळवण्यात आली. तेथून मनमाड रेल्वे स्टेशन येथील जि आर पी व आर पी एफ यांना ट्रेन अटेंड करण्याबाबतची सूचना करण्यात आली. त्यानुसार सदर गाडी मनमाडला पोहोचल्यानंतर जि आर पी  यांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस सध्या बाळाच्या अज्ञात आई - वडिलांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.