Header Ads

Header ADS

धनाजी नाना महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या वतीने मोहमांडली येथे मोफत रक्तगट तपासणी व संसर्ग जन्य आजार जनजागृती शिबिर

Free-blood-group-testing-and-communicable-disease-awareness-camp-on-behalf-of-department-of-microbiology-at-dhanaji-nana-college-mohamandali


धनाजी नाना महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या वतीने मोहमांडली येथे मोफत रक्तगट तपासणी व संसर्ग जन्य आजार जनजागृती शिबिर

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने मोहमांडली तालुका यावल येथे रक्तगट तपासणी तसेच संसर्गजन्य आजाराबद्दल जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्री शिरीष दादा चौधरी युवा नेतृत्व चि. धनंजय चौधरी व 

धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री प्रभात चौधरी सदस्य , सातपुडा विकास मंडळ, पाल तसेच सचिव, जनता शिक्षण मंडळ, खिरोदा हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी मोहमांडली येथील सरपंच सौ रजबिया मुस्तफा तडवी,  मुस्तफा हुसेन तडवी, शहावीर तडवी ग्रामपंचायत सदस्य, किशोर वासुदेव राणे, श्री निळकंठ बाविस्कर, मुख्याध्यापक श्री रवींद्र तुकाराम कुमावत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ एस पी जाधव, विभाग प्रमुख प्रा सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत सूक्ष्मजीवशास्त्र विद्यार्थ्यांच्या वतीने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रभात चौधरी यांनी अशा प्रकारच्या शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व व रक्तगट बद्दल सविस्तर माहिती दिली. श्री किशोर राणे माध्यमिक शिक्षक आश्रम शाळा मोहमांडली यांनी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना या शिबिराचा प्रचंड उपयोग होईल व यातून संसर्गजन्य आजाराची माहिती समजून निरामय आरोग्याकडे विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची वाटचाल सुरू होईल असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शंकर जाधव यांनी संसर्गजन्य आजार म्हणजे काय ? त्यांचा प्रसार कसा होतो ? त्यापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबत विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावकऱ्यांनी शिबिराला प्रोत्साहन दिले याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.  यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख सुवर्णा पाटील यांनी सद्यस्थितीत वेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराविषयी माहिती सांगत एक वेळ कोरोनापेक्षाही घातक असे हे आजार रोखणे आपल्या साऱ्यांचीच जबाबदारी असल्याचे नमूद करीत रक्तगट तपासणी करणे अतीआवश्याक असल्याचे  असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र शिरतुरे व वर्षा परदेशी यांनी केले व कल्याणी रत्नपारखी हिने कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. यावेळी या मोफत शिबिरात प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मोहमांडली येथील २४० व २० विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा अंधारमळी असे एकूण २६० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी विभागाचे प्रा जयंत भारंबे, प्रा योगेश पाटील, प्रयोगशाळा सहाय्यक श्री महेंद्र चौधरी, प्रयोगशाळा परिचर श्री सुरज चौधरी व स्थानिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि गावकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.