Header Ads

Header ADS

रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार ‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती अनियंत्रित हायपरटेन्शन व्यवस्थापित करणारी पहिली रेनल डिनरव्हेशन शस्त्रक्रिया नवी मुंबईत पार पडली

First-ever renal-denervation-surgery-to-manage-blood-pressure-effectively-renal-denervation-treatment-method-in-uncontrolled-hypertension-conducted-in-New-Mumbai


 रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार ‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती

अनियंत्रित हायपरटेन्शन व्यवस्थापित करणारी पहिली रेनल डिनरव्हेशन शस्त्रक्रिया नवी मुंबईत पार पडली

लेवाजगत न्यूज उरण :सुनिल ठाकूर  जेव्हा ४२ वर्षीय रुग्णामध्ये धोकादायक पद्धतीने वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात नियमित उपचार अयशस्वी ठरली, तेव्हा डॉ. ब्रजेश कुमार कुंवर रेनल डिनर व्हेशन या एका अभिनव उपचाराकडे वळले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुंवर यांनी नवी मुंबईतील अशा प्रकारची पहिलीच तीव्रता कमीत कमी असलेली शस्त्रक्रिया केली. हे उपचार म्हणजे हायपरटेन्शन (HT) व्यवस्थापनामध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतात. रायगड, उरण येथे राहणारे श्री.चेतन वाझेकर हे मनमुराद भटकंती करणारे आणि साहसी उत्साही पर्यटक. विविध प्रकारची अँटीहाइपरटेन्सिव्ह औषधे घेत असूनही अनियंत्रित राहत असलेल्या उच्च रक्तदाबाच्या विकाराचे म्हणजेच रेझिस्टंट हायपरटेन्शन (HT) विरुद्ध ते झुंज देत होते. सक्रिय, कार्यमग्न जीवनशैली असूनही त्यांचा रक्तदाब धोकादायकरित्या उच्चच राहिला होता. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढत होता. या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकत होता.

   श्री.चेतन वाझेकर, पेशंट, उच्च रक्तदाब विकारग्रस्त म्हणाले,“या उपचारांपूर्वी माझ्या उच्च रक्तदाबामुळे दैनंदिन कामे करणे देखील मला कठीण झाले होते. माझ्या तब्येतीची मला सदैव काळजी वाटत होती. डॉ. कुंवर आणि अपोलो हॉस्पिटलमधील टीमचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे मला नवजीवन मिळाल्यासारखेच वाटत आहे. माझा रक्तदाब नियंत्रणात आहे आणि आता सतत मला कधी काय होईल याची चिंता करत बसण्याऐवजी मला छान, स्वास्थ्यपूर्ण वाटत आहे. आता परत एकदा आयुष्याची घोडदौड सुरू करायला आणि स्वतःच्या तब्बेतीची काळजी करत न बसता नवनवीन शिखरांवर विजय मिळवण्यास मी खूप उत्सुक आहे.”


रेनल डीनर्व्हेशन ही एक नवीन तीव्रता कमी असलेली उपचार प्रक्रिया असून रेझिस्टंट (प्रतिरोधक) एचटी व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाते. रेझिस्टंट एचटी म्हणजे सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद न देणारा उच्च रक्तदाब. रिनल म्हणजे मूत्रपिंड साठीच्या धमन्यांच्या सभोवतालच्या मज्जातंतूला रेडिओ फ्रिक्वेंसी पृथक्करण वितरीत करण्यासाठी कॅथेटर वापरल्याने, उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नसा विस्कळीत होतात. मज्जासंस्थेच्या क्रियांमधील ही घट रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि बहुविध औषधांची आवश्यकता कमी करू शकते.


डॉ. ब्रजेश कुमार कुंवर, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,“उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये रेझिस्टंट एचटीचे प्रमाण 10% ते 20% पर्यंत असते. अवघे ४२ वर्षांच्या तरुण वयात अनियंत्रित एचटीचे निदान झालेल्या रुग्णावर या स्थितीचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा रुग्ण सक्रिय जीवनशैली असलेला आणि खूप उत्साही आहे. अशा व्यक्तीला आपण जर वेळेवर वैद्यकीय उपचार मदत करू शकलो नाही तर ते फारच दुःखद ठरू शकते. रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि दीर्घकाळ औषधावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रेनल डीनर्व्हेशन ही एक आश्वासक उपचार पद्धती ठरली.”


श्री.अरुणेश पुणेथा, मुख्य कार्यकारी अधिकारी- प्रादेशिक पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल म्हणाले,“डॉ. ब्रजेश कंवर यांनी केलेली रेनल डीनर्व्हेशन प्रक्रिया ही आमच्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्याची आणि क्षमतेची पावती आहे. अपोलो हॉस्पिटल मधील कार्डिओलॉजिस्ट (हृदयरोग तज्ञ) संपूर्ण स्तरावर कार्डियाक केअर म्हणजेच हृदयाची काळजी घेतात. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैयक्तिकृत प्रोहेल्थ हृदय तपासणी पासून ते जटिल, गुंतागुंतीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या, स्ट्रक्चरल अशा हृदय शस्त्रक्रिया, अररीदमिय डिसऑर्डर आणि हॉर्ट फेल पर्यंत विकार व्यवस्थापित करण्यासाठी प्रगत उपचारपद्धती समाविष्ट असतात. ही नवीन इंटरव्हेंशनल प्रक्रिया आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असून आमच्या रूग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य पुरवण्याच्या आमच्या बांधिलकीवर प्रकाश टाकते.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.