Header Ads

Header ADS

भीषण अपघात -जालना-बीड रोडवर बस-ट्रकचा भीषण अपघातात ६ जण जागीच ठार १८ गंभीर,६ जणांची प्रकृती चिंताजनक

 


भीषण अपघात -जालना-बीड रोडवर बस-ट्रकचा भीषण अपघातात ६ जण जागीच ठार १८ गंभीर,६ जणांची प्रकृती चिंताजनक

लेवाजगत न्यूज जालना- जिल्ह्यातील जालना - वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ६जण जागीच ठार झाले असून, १८ जण जखमी झालेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

   यासंबंधीच्या माहितीनुसा, अपघातग्रस्त बस अंबाजोगाई आगाराची होती. ती जालन्याच्या दिशेने जात होती. अंबडपासून १० किमीवर ती आयशर ट्रकला धडकली. त्यात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

   जालना बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले.घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. नक्की अपघात कसा झाला ही माहिती अजून ही पुढे आली नाही.

   बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक बसली , प्रत्यक्षदर्शी च्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते. यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.