Header Ads

Header ADS

प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन युट्यूब चॅनल हॅक, सर्व व्हिडीओ डिलीट, रणवीरचं करिअर संपलं?

Famous-YouTuber-Ranveer-Allahabadia's-Two-YouTube-Channels-Hack-All-Videos-Delete- Ranveer's-Career-Ended?


 प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन युट्यूब चॅनल हॅक, सर्व व्हिडीओ डिलीट, रणवीरचं करिअर संपलं?

 वृत्तसंस्था मुंबई-प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनेल हॅक झाले आहेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनेल सायबर क्रिमिनल्सनी हॅक केले आहेत. तसेच त्याच्या चॅनलचे नावही हॅकर्सनी बदलले आहेत. चॅनलचे नाव बदलून ‘टेस्ला’ ठेवण्यात आले आहे.

      रणवीरचे युट्यूब चॅनल हॅक करून बीअर बायसेप्सचे नाव @Elon.trump.tesla_live2024 असे बदलण्यात आले. तर त्याच्या पर्सनल चॅनेलचे नाव बदलून @tesla.event.trump 2024 असे ठेवण्यात आले आहे. यूट्यूबर रणवीरने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याचे पहिले यूट्यूब चॅनेल बीअर बायसेप्स सुरू केले होते. आता त्याचे सात यूट्यूब चॅनल आहेत. त्याच्या सर्व चॅनेलवर त्याचे जवळपास ११ मिलियन फॉलोअर्स आहेत. सातपैकी दोन चॅनल हॅक झाले असून सगळे व्हिडीओ हटवण्यात आले आहेत.

      मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, हे चॅनल युट्यूबरवर सर्च केल्यावर एक मेसेज दिसतोय. त्यात कंपनीच्या पॉलिसींचे उल्लंघन केल्यामुळे ते काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आले. तर लाइव्ह स्ट्रीमिंग पेजवर हे पेज उपलब्ध नाही, असं दिसतंय.

     करीना कपूर, जान्हवी कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, नीना गुप्ता अशा अनेक स्टार्सनी आतापर्यंत रणवीर अलाहाबादियाच्या चॅनलला मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले. फक्त सेलिब्रिटीच नाही तर राजकीय नेत्यांच्या मुलाखतीही होत्या.

       चॅनल हॅक झाल्यानंतर यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये त्याने खाद्य पदार्थांचा एक फोटो शेअर करत लिहिलं, ‘मी माझ्या आवडत्या खाद्य पदार्थांसह मेन चॅनल हॅक झाल्याचा आनंद साजरा करत आहे. डेथ ऑफ बिअर बायसेप्सचा मेट डेथ ऑफ डाएट. बॅक टू मुंबई.’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.