Header Ads

Header ADS

फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालय येथे हिंदी सप्ताहाची सांगता व बक्षीस वितरण समारोह संपन्न

 

बक्षीस वितरण समारोह संपन्न

फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालय येथे हिंदी सप्ताहाची सांगता व बक्षीस वितरण समारोह संपन्न

लेवाजगत न्यूज फैजपूर:-तालुका यावल येथिल धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील हिंदी विभागतर्फे १४ सप्टेंबर 'हिंदी दिवस' निमित्त आयोजित 'हिंदी सप्ताह' चा आज समारोप समारंभात बक्षीस वितरण करण्यात आले. दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते २० सप्टेंबर २०२४ दरवर्षीप्रमाणे हिंदी विभाग तर्फे हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने सात दिवस निबंध, रांगोळी, मेहंदी,वादविवाद,चित्रकला, काव्यवाचन व सामान्य ज्ञान आशा विविध  सात स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता पैकी ३५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिकसाठी निवड करण्यात आली होती. त्यां सर्व यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांचा आज दिनांक २६ रोजी 'समारोप समारंभात'  पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उप प्राचार्य डॉ.हरीश नेमाडे, प्रमुख पाहुणे डॉ.जगदीश पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ.गोविंद मारतळे, कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत तसेच विभाग अध्यक्ष व उप प्राचार्य डॉ.कल्पना पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे, एनएसएस अधिकारी डॉ.सतीश पाटील उपस्थित होते, या सर्व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून डॉ.ईश्वर ठाकूर, डॉ.ताराचंद सवसाकडे, डॉ. आरती भिडे,डॉ.तिलोत्तमा चौधरी,  डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ. जयश्री पाटील, डॉ. सरला तडवी, डॉ. सविता वाघमारे,डॉ.एस.व्ही.जाधव,डॉ.सीमा बारी प्रा. सचिन कपले, प्रा.विजय तायडे यांनी सहकार्य केले. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ.कल्पना पाटील यांनी तर सूत्रसंचालन कु.पौर्णिमा कोळी व आभार कु.जागृती कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

    बक्षीस पात्र यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती खालील प्रमाणे.१.निबंध स्पर्धा-प्रथम पौर्णिमा कोळी, द्वितीय छाया,शिरसाळे, तृतीय रूपा अग्रवाल, उत्तेजनार्थ श्रद्धा नाथ जोगी ,कनिष्ठ गायत्री चौधरी,  डिम्पल सरोदे,२.काव्यवाचन स्पर्धा-प्रथम झकोरिया खान, द्वितीय छाया शिरसाळे, तृतीय समीर तडवी, कनिष्ठ भूमिका परदेशी,३.रांगोळी स्पर्धा-प्रथम रूपा अग्रवाल, द्वितीय नेहा पाटील, तृतीय उज्वला पाटील, उत्तेजनार्थ पिंकी भोगे, कनिष्ठ ओजस्वी बोंडे,४.मेहंदी स्पर्धा-प्रथम दिशा अग्रवाल, द्वितीय रूपा अग्रवाल, तृतीय देवयानी दोडके, उत्तेजनार्थ ललिता पाटील, कनिष्ठ गट डिंपल सरोदे प्रथम, मानसी आमोदकर द्वितीय ,५.सामान्य ज्ञान स्पर्धा-आर्यन कोळी प्रथम, स्नेहा शेंणगे द्वितीय, ओम राजपूत द्वितीय, माधुरी भरणे तृतीय, कनिष्ठ संयोगिता राजपूत,६.वक्तृत्व स्पर्धा-प्रथम गुंजन जैन, द्वितीय रूपा अग्रवाल, तृतीय अल्तमास इलियास, कनिष्ठ गट कशीरा गलवाडे ,७.चित्रकला स्पर्धा-प्रथम रूपा अग्रवाल, द्वितीय दिशा अग्रवाल, तृतीया लतुजा भंगाळे, उत्तेजनार्थ चैताली चौधरी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.