Header Ads

Header ADS

प्रत्येकाने वाचन करावे वाचनाने यशाचे नवनवीन मार्ग निर्माण होतात-व.पू.होले;पुस्तकाची मैत्री करा यश जवळ येईलच-बी.जी.लोखंडे

 

Everyone-should-read-by-reading-new-paths-of-success-are-created-and-poo-became-friends-of-the-book-success-will-come-close-by-g-irons

प्रत्येकाने वाचन करावे वाचनाने यशाचे नवनवीन मार्ग निर्माण होतात-व.पू.होले

 पुस्तकाची मैत्री करा यश जवळ येईलच -बी.जी.लोखंडे

लेवा जगत न्यूज सावदा-येथील पालिका संचलित श्री. आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने सुरू असलेले अभियानांतर्गत सोमवार रोजी शाळेच्या सभागृहात महा वाचन उत्सव वाचे उद्घाटन ग्रंथराज ज्ञानेश्वरी च्या पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यिक कथाकथनकार व. पु.होले यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त शिक्षक कवी बी.जी. लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील,माजी नगरसेवक श्याम पाटील, नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, वाय.यु. पाटील यांच्या उपस्थितीत महावाचन मेळावा व ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

  यावेळी व.पु. होले म्हणाले की प्रत्येकाने वाचनाची सवय अवलंबली पाहिजे कुठेही जा पुस्तक दिसले म्हणजे विकत घ्या व ते वाचन करा त्यातूनच आपल्याला यशाचे नवनवीन मार्ग मिळत असतात.आजच्या या युगात वाचन संस्कृती लोप पावत असली तरी यशाची शिखर गाठायचे असेल तर वाचन केलेच पाहिजे असे मत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

      बीजी लोखंडे यांनी आपण विद्यार्थी जीवनात असताना वेगवेगळे मित्र मैत्रिणी करीत असतो पण ते आपल्याला कुठपर्यंत साथ देतात यापेक्षा पुस्तकाची मैत्री करा यामुळे  यश आपल्याला जवळच येईल व आपण प्रत्येक कार्यात यशस्वी होत रहाल. 

   यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ही आपल्या विद्यार्थी जीवनातील त्यांनी स्वलिखित कविता विद्यार्थ्यांसमोर म्हणून दाखवली व आपल्या आठवणींना उजाळा दिला यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना दाद दिली. यावेळी काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या स्वलिखित कवितांचे हे यावेळी वाचन केले हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन एनसीसी ऑफिसर संजय महाजन यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.