Header Ads

Header ADS

भुसावळच्या डबल हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू !

 

भुसावळच्या डबल हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू !

भुसावळच्या डबल हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू !

लेवाजगत न्यूज भुसावळ-येथील संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा दुहेरी खून प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन पथरोड याचा उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.




  भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवरून रस्त्याने कारमधून येत होते. त्यावेळी जुन्या वादातून राजु सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर गोळीबार केल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलीसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तर इतर मारेकरी फरार झाले आहेत.

   दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपींना नंदुरबार येथील कारागृहात हलविण्यात आले आहे. यातील आरोपी नितीन पथरोड याची प्रकृती काही दिवसां पूर्वी बिघडल्याने त्याच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असतांना काल रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. नंदुरबार पोलिसांच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.