Header Ads

Header ADS

कांग नदीत वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू

 

कांग-नदीत-वाहून-गेल्याने-तरुणीचा-मृत्यू

कांग नदीत वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू

लेवाजगत न्यूज जामनेर -जोरदार पावसामुळे जामनेर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून खासगी शिकवणी वर्गासाठी कांग नदीच्या पुलावरून पायी जात असलेल्या १८ वर्षीय तरुणी तोल जाऊन पुरात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी पूनम बाविस्कर ही शिकवणीला जाण्यासाठी निघाली होती. कांग नदीच्या पुलावरून वाहने ये- जा करत असल्याने पूनम ही पुलाच्या कडेने जात होती. तिचे लक्ष पाण्याच्या प्रवाहाकडे गेले असता चक्कर आल्याने ती पुलावरून नदीपात्रात पडून वाहून गेल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली. मृतदेह खादगावजवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला. पूनमचे आईवडील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.