Header Ads

Header ADS

चिनावलला आज श्री गणेश विसर्जन मिरवणूक

 

Chinavalala-Today-Sri-Ganesh-Immersion-Procession

चिनावलला आज श्री गणेश विसर्जन मिरवणूक

लेवाजगत न्यूज चिनावल-चिनावल ता. रावेर येथे दिनांक सात शनिवार रोजी १८ मंडळांनी यंदा बाप्पाची स्थापना केली आहे. गावातील श्री विठ्ठल, प्रभात, क्रांती, नूतन, नवयुवक, आदर्श, नवनगर, न्यू भारत, मरिचय, अमर, समर्थ, श्री गणेश, सुयोग, परीस, जागृती गणेश मंडळ यांच्यासह १८ गणेश मंडळांनी सुंदर आकर्षक मूर्ती आणून त्यांची स्थापना मान्यवरांच्या हस्ते केली होती .

Chinavalala-Today-Sri-Ganesh-Immersion-Procession


   यावर्षी  वैशिष्ट्य असे की श्री गणेश मूर्तींची उंची सरासरी आठ ते सोळा फुटापर्यंत आहे. अनेक मंडळांनी क्रीडा ,सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिर ही मंडळांनी घेतले .काही मंडळातर्फे आकर्षक सजावटीसह सामाजिक जागृतीचे देखावे केले होते . सकाळ संध्याकाळ ज्या त्या भागातील महिला ,पुरुष, युवक, युवती आरती करण्यासाठी उपस्थित राहत होते. दरवर्षीप्रमाणे  पूर्वापार येथील गणेशोत्सव हा सात दिवसापर्यंत उत्साहात सुरू असतो आज सात दिवस पूर्ण होत असल्याने चिनावल येथे जल्लोषात आणि उत्साहात डफ, बेंजो, बँड, ढोल ताशे यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक निघेल. मिरवणुकीत शांतता राखावी. यासाठी सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांचा मोठा स्टॉप बंदोबस्तासाठी उपस्थित असेल. मिरवणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.