Header Ads

Header ADS

गणेशोत्सव विसर्जन काळात जळगांव शहरातील वाहतुक मार्गात बदल

 

Change in traffic-route-in-Jalgaon-city during Ganeshotsav-immersion-time

गणेशोत्सव विसर्जन काळात जळगांव शहरातील वाहतुक मार्गात बदल

लेवाजगत

लेवाजगत


लेवाजगत न्यूज जळगाव दि. 13 - शहरात 07 सप्टेंबर  ते  17 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

    जळगाव ते पाचोऱ्या वरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस टी बसेस, अवजड वाहने करीता इच्छादेवी चौकी - डी मार्ट - मोहाडी रोड Y पॉईंट - गायत्री नगर - गणेश घाट - सेंट टेरीसा स्कुल - हॉटेल ग्राप्पेस - मलंगशहा बाबा दर्गा - शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहने विसर्जन दरम्यान बंद राहील. तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतुक (हलक्या व मध्यम वाहनाकरीता) - इच्छादेवी चौकी - डि मार्ट - मोहाडी रोड Y पॉईंट - गायत्री नगर -  गणेश घाट - सेंट टेरीसा स्कुल - हॉटेल ग्रॅपेस - मलंगशहा बाबा दर्गा - शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या सर्व मध्यम व हलक्या वाहनांकरीता मार्ग बंद राहिल.

  जळगाव कडून पाचोऱ्याकडे  जाणा-या कार व मोटार सायकल करीता आकाशवाणी चौक - काव्यरत्नावली चौक - महाबळ चौक - संत गाडगेबाबा चौक - राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) - मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरा कडे आणि पाचोऱ्याकडून जळगाव कडे येणा-या  कार व मोटार सायकलसाठी मलंगशहा बाबा दर्गा - गुरू पेट्रोलपंप (G मॉल) - राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) - संत गाडगेबाबा चौक - महाबळ चौक - काव्यरत्नावली चौक - आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडे पर्यायी मार्ग असणार आहे.

  आसोदा- भादली कडून जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज -  गजानन मालुसरे नगर - जुने जळगाव - लक्ष्मी नगर - कालंका माता मंदीर मार्गे - महामार्गावरुन अजिंठा चौक - आकाशवाणी चौक - नविन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करु शकतील. पाचोरा कडून येणा-या जड वाहनांन करीता वावडदा – नेरी - अजिंठा चौक मार्गे जळगांव पर्यायी मार्ग असणार आहे असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.