Header Ads

Header ADS

"चेअरमन रवींद्र बेंडाळे यांनी दिला दूध उत्पादकांना भरभरून बोनस" सावदा दूध उत्पादक संस्थेने दिला म्हशीच्या दुधात १२ रुपये ९० पैसे तर गाईच्या दुधात २ रुपये ५० पैसे प्रति लिटर बोनस भाव फरक

Chairman-Ravindra-Bendale-gave-the-milk-producers-full-bonus-Savda-milk-the-producing-organization-gave-12-rupees-90-paise-in-buffalo-milk-and-cow-milk-2-rupees-  50-paise-per-litre bonus-price-difference


 "चेअरमन रवींद्र बेंडाळे यांनी दिला दूध उत्पादकांना भरभरून बोनस "

सावदा दूध उत्पादक संस्थेने दिला म्हशीच्या दुधात १२ रुपये ९० पैसे तर गाईच्या दुधात २ रुपये ५० पैसे प्रति लिटर बोनस भाव फरक 

लेवा जगत न्यूज सावदा- रविवार रोजी  सावदा दूध उत्पादक संस्थेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन रवींद्र श्रावण बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी  व्हाईस चेअरमन देवानंद नामदेव बढे, संचालक जगदीश लहू बढे, संजय रामचंद्र चौधरी, धनंजय वासुदेव चौधरी, परीक्षेत शरद वाणी, रवींद्र बळीराम नेमाडे,जोशना बोंडे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.यावेळी गाईचे व म्हशीचे दुधाचे संस्थेस  जास्त पुरवठा करणाऱ्या उत्पादक सभासदांचा प्रोत्साहनपर रोख रक्कमेचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

     सर्वात जास्त म्हशीचे दूध पुरवठा करणारे प्रथम क्रमांकाचे विनय बढे, दुसरा क्रमांक जोशना बोंडे, तिसरा क्रमांक अरुण बढे, चौथा क्रमांक रवींद्र नेमाडे, पाचवा क्रमांक बिपिन वाणी यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले तर गाईच्या दुधाचा पुरवठा करणाऱ्या सदस्य  राकेश बढे प्रथम क्रमांक ,किशोर महाजन द्वितीय क्रमांक, संजय नेहते तृतीय क्रमांक, राहुल वाणी चतुर्थ क्रमांक, रवींद्र बेंडाळे पाचवा क्रमांक या क्रमाने अनुक्रमे मान्यवरांच्या हस्ते  बक्षिसे देण्यात आली. समस्त दूध उत्पादकांना लीटर प्रमाणे म्हशीच्या दुधास १२ रुपये ९० पैसे तर गाईच्या दुधास २ रुपये ५० पैसे लिटर याप्रमाणे बोनस भाव फरक देण्यात आला. आतापर्यंतच्या इतिहासात हा जास्तीत जास्त भाव फरक देण्यात आल्याने दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते तर नव्यानेच सचिव पदी रुजू झालेले चेअरमन संचालक सह सचिव दिलीप बेंडाळे यांना दूध उत्पादक शुभेच्छा देत होते. सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेची स्थापना ११-१०-१९७८  रोजी झाली सतत ऑडिट वर्ग "अ" मिळणारी संस्थेचे ११७४ सभासद असून आज संस्थेची चौरेचाळीसावि वार्षिक सर्वसाधारण सभा  पार पडली. वार्षिक सभा सुरू होण्यापूर्वी मयत सभासद,जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. एकूण नऊ विषयावर  खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभा एक तासात संपली. संस्थेच्या वतीने संचालक जगदीश बडे यांनी उपस्थित यांचे आभार मानले .यावेळी सर्व कर्मचारी सभे साठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.