Header Ads

Header ADS

राज्यात काँग्रेस सरकार आल्यास महिलासाठी ३ हजार रुपयाची महालक्ष्मी योजना -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा

 

Big announcement by Congress state president Nana Patole of the Mahalakshmi scheme of three thousand rupees for women if the Congress government comes to the state

राज्यात काँग्रेस सरकार आल्यास महिलासाठी ३ हजार रुपयाची महालक्ष्मी योजना -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा

लेवाजगत न्यूज मुंबई -राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

   लाडकी बहीन योजनेवरुन राज्य सरकार इव्हेंट करत आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून लूट चालू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे. मात्र, भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहित आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. महालक्ष्मी योजनेच्या नावाने ही योजना आणणार असून त्यामध्ये मात्र महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच त्यात दर व्रषी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.

   राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने या योजनेवर टीका करण्यात येत आहे. त्यात आता नाना पटोले यांनी यापेक्षाही चांगली योजना आणण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वतीने या नव्या योजनेची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर आमच्या सरकारच्या या योजनेमध्ये दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.