Header Ads

Header ADS

मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते रविवार होणार "कोळी भवना" चे भूमिपूजन


Bhoomipujan of Koli Bhavana will be held on Sunday with the auspicious hand of the Chief Minister.


मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते  रविवार होणार "कोळी भवना" चे भूमिपूजन

 लेवाजगत न्यूज मुंबई-कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ऐरोली, नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या "कोळी भवन" या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २२/०९/२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. ऐरोली, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे.

याबाबत माहिती देताना मा. आमदार रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरी, शिक्षण, हॉस्पिटल अशा विविध कामानिमित्त मुंबई शहरात येणाऱ्या सर्वसामान्य आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांकरिता आणि विविध स्पर्धांच्या तयारी करीता ग्रामीण भागातून येणाऱ्या कोळी समाजातील युवक-युवतींना राहण्याची सोय व्हावी. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील भूमिपुत्र-प्रकल्पग्रस्त, कोळी-आगरी बांधवांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांकरिता कोळी महासंघाच्या माध्यमातून रु. २० कोटी खर्च करून नवी मुंबई येथे भव्य असे कोळी भवन उभारण्यात येत आहे. तसेच या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याचे सांगितले. तसेच या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याकरीता राज्यातील सर्व आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांनी आणि नवी मुंबईतील भूमिपुत्र-प्रकल्पग्रस्त, कोळी-आगरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने ऐरोली, नवी मुंबई येथे उपस्थित रहावे असे सर्व समाज बांधवांना आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.