Header Ads

Header ADS

भालोद येथे'चाहाय' या'लेवा गणबोली 'भाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

Bhalod-here-want-to-take-the-publication-of-anthology-of-stories-in-the-Ganboli-language-with-enthusiasm

लेवाजगत

लेवाजगत


भालोद येथे'चाहाय' या'लेवा गणबोली 'भाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

लेवा जगत न्यूज भालोद- भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास व संवर्धन केंद्रातर्फे खानदेशातील शेळगाव येथिल शीतल शांताराम पाटील लिखित व जेष्ठ कादंबरीकार ॲड.विलास मोरे यांची पाठराखण लाभलेल्या 'चाहाय ' या'लेवा गणबोली 'भाषेतील  कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ दिनांक -१२ सप्टेंबर २०२४ ,गुरुवार रोजी संपन्न झाला. बबन काकडे(उपविभागीय अधिकारी फैजपूर विभाग) यांच्या शुभहस्ते प्रकाशन प्रकाशन करण्यात आले. मा. चंद्रकांतदादा चौधरी (अध्यक्ष ,से. ए.सोसायटी ,भालोद . तालूका यावल)कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते.तर  लिलाधर चौधरी (चेअरमन से.ए.सोसायटी )अनिल चौधरी (उपाध्यक्ष ,से. ए.सोसायटी )मोहनदादा चौधरी (व्हा.चेअरमन ,से.ए.सोसायटी )नितीन चौधरी (सचिव,से .ए .सोसायटी )प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती झाला.

   कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास व संवर्धन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ.जतिन मेढे स(संचालक ) , प्रा.डॉ.दिनेश पाटील (सहसंचालक ) यांनी विशेष कार्यभार सांभाळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.