Header Ads

Header ADS

वीर वाजेकर महाविद्यालयाच्या आर्यन मोडखरकरने स्विमिंगमध्ये पटकावले दोन सुवर्ण व एक रौप्य पदक

Aryan Modkharkar of Veer Wajekar College won two gold and one silver medals in swimming.


वीर वाजेकर महाविद्यालयाच्या आर्यन मोडखरकरने स्विमिंगमध्ये पटकावले दोन सुवर्ण व एक रौप्य पदक          



               

लेवाजगत न्यूज  उरण सुनिल ठाकूर  :वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे येथील आर्यन मोडखरकर (एफ.वाय.बी.एस.सी.आय.टी) या विद्यार्थ्याने आपल्या जबरदस्त कौशल्याने आणि मेहनतीने १३ व १४ सप्टेंबर २०२४ रोजी प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली येथे मुंबई विद्यापीठ आयोजित आंतर-महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये (पुरुष) गटात १) ५० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सुवर्ण पदक ,२) ५० मीटर बॅक स्ट्रोक सुवर्ण पदक,३) ५० मीटर बटरफ्लाई रौप्य पदक मिळवून वीर वाजेकर महाविद्यालयाला जलतरण स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळवून दिली.

आर्यनने आपल्या स्पर्धेत सुरूवातीपासूनच चुरस निर्माण केली होती. त्याच्या जलद आणि सुसंगत पोहण्याच्या तंत्रामुळे त्याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पहिल्या स्थानावर आपला हक्क प्रस्थापित केला. त्याच्या या कामगिरीने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले असून, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांच्याकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

आर्यनचे वडील म्हणाले, “त्याच्या सातत्यपूर्ण सराव आणि कष्टामुळेच आज त्याने हे यश मिळवले आहे. तो आगामी स्पर्धांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.” 

महाविद्यालयाच्या क्रीडा विभागप्रमुख डॉ. विलास महाले यांनी आर्यनच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील, श्री. सुधीर घरत, सौ. भावना घाणेकर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार,सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक  यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले त्यांना जिमखाना विभागाचे श्री. भूषण ठाकूर,श्री.देवेंद्र कांबळे यांचे मागर्दर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.