Header Ads

Header ADS

अनोमदर्शी तायडे यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या रावेर तालुका अध्यक्षपदी निवड

Anomdarshi-Tayde-Voice-of-Media-Raver-Taluka-Chairmanship-Election


अनोमदर्शी तायडे यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या रावेर तालुका अध्यक्षपदी निवड

लेवा जगत न्यूज सावदा- देशासह जगातील पत्रकारांसाठी कार्य करणाऱ्या भारतातील नंबर एक संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुका अध्यक्षपदी सावदा येथील रहिवासी अनोमदर्शी तायडे व कार्याध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष मिलिंद टोके यांनी गुरुवार रोजी केली. त्यांना नियुक्तीचे पत्र महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज सतपंत मंदिर संस्थान फैजपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

    आज गुरुवार रोजी दुपारी वडोदा प्र सावदा येथील तुलसी हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्या उपस्थितीत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते सम्राट वृत्तपत्रचे प्रतिनिधी व आवाज परिवर्तनाच्या या साप्ताहिकाचे संपादक अनोमदर्शी तायडे आणि सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार प्रवीण पाटील यांना रावेर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आले.

    यावेळी सावदा येथील पत्रकार श्याम पाटील,राजीव दिपके,साजिद शेख,पंकज पाटील,जितेंद्र कुलकर्णी ,उमाकांत पाटील, शागिर शेख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.