Header Ads

Header ADS

सावदा येथील ग्रामीण रुग्णालयातून विवाह नोंदणीचा बारकोड सह दाखला मिळावा -अजय भारंबे यांची निवेदनाद्वारे मागणी

Ajay Bharambe's request for marriage registration with barcode from Savada rural hospital


 सावदा येथील ग्रामीण रुग्णालयातून विवाह नोंदणीचा बारकोड सह दाखला मिळावा -अजय भारंबे यांची निवेदनाद्वारे मागणी

लेवा जगत न्यूज सावदा-शहरात असलेल्या व नव्याने सुरू झालेल्या ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी प्रक्रिया नियमित व सुरळीत सुरू आहे. परंतु लोकांना जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते ते शासनाच्या अद्यावत प्रणालिनुसार बारकोड सहित मिळत नसल्याने नववधू ना शासकीय कामासाठी व  आधार कार्ड नूतनीकरण  करण्यात अडचणी येत असून आधार कार्ड नूतनीकरण होत नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. ही अडचण व पुढे येणाऱ्या समस्या सुटाव्या म्हणून सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांना एका निवेदनाद्वारे पालिकेचे गटनेते अजय भारंबे यांनी केली आहे.  

      येथील ग्रामीण रुग्णालयात  सॉफ्टवेयर  त्वरित उपलब्ध करून द्यावे . बारकोड नसलेला विवाह नोंदणी दाखला कोणत्याच कामात उपयोगी येत नसल्याने तो फक्त शोपीस म्हणून घरात ठेवलेला असतो. नवीन अद्यावत असलेले सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्यास विवाह नोंदणी सोयीस्कर व बारकोटची प्रिंट यातून निघेल व येणाऱ्या अडचणींचा मार्ग सुकर होईल . सॉफ्टवेअर नवीन उपलब्ध झाल्यास  विवाह नोंदणी करणे सुलभ व फायदेशीर होईल बारकोडसह दाखला मिळाल्यास  तो विवाह नोंदणीचा दाखला कुठेही उपयोगात धरला जाईल. ग्रामीण रुग्णालयात सावदा शहर व परिसरातील लहान मोठी जवळपास १०० गावे जोडलेले आहे. याचा विचार करून  तत्काळ उपाय योजना करावी व सदरील सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सावदा पालिकेचे माजी गटनेते अजय भागवत भारंबे यांनी एका निवेदनाद्वारे सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सचिन व्ही पाटील यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे रवाना केल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.