Header Ads

Header ADS

एस टी बसला आयशरने कापले,२५ प्रवासी जखमी, तीन जण गंभीर

25-passengers-injured-three-critically-injured-by-Eicher-in-st-t-bus


एस टी बसला आयशरने कापले,२५ प्रवासी जखमी, तीन जण गंभीर









   वृत्तसंस्था धुळे-बडोदा-धुळे बसला आयशरने समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता चिमठाणे गावाजवळ झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. त्यातील तीन प्रवासी गंभीर आहे. चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यावर त्यांना हिरे रुग्णालयात हलवण्यात आले.

     धुळे आगाराची बस (एमएच २० बीएल २५९७) बडोदा येथून धुळ्याकडे येत असताना चिमठाणेजवळ समोरून येणाऱ्या आयशरने (एमएच १८ बीझेड ००२६) बसला धडक दिली. या अपघातात बसची एक बाजू पूर्णपणे कापली गेली. अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले. आमदार जयकुमार रावल यांनी घटनास्थळी थांबून प्रवाशांना तात्काळ चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमाकांत पाटील, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. रितिका अहिरराव यांनी प्राथमिक उपचार केले.

   अपघातातील जखमी प्रवासी जखमी प्रवाशी असे रंजीता प्रशांत सावंत(वय. ४२, रा.धुळे), प्रतीक्षा रोहित कांकरिया (३०), चंदना प्रवीण कोचरिया (५२, पुणे), तुषार रतिलाल पाडवी (३१, तळोदा), रियाज अहमद जाकीर नबी (२०), चंद्रकांत रामचंद्र शितोळे (८२), विमल चुनीलाल भील (७०, तळोदा), कविता सुनील भोई (२५, तळोदा), गुलशन गालिफ खाटीक (४०, धुळे), गालीफ खाटीक (८५, शिंदखेडा), रखमाबाई शंभो पवार (६७, दरणे), योगिता मानसिंग वसावे (२७, मोगरा), आयुबी तरूनीश तवर (२१, तळोदा), अजित खान बेलदार (४२), आधार मगन (७०), वैशाली आनंदा पाटील (४०, निशाणे), दिलीप भीमराव पाटील (६१, शेवगाव), संदीप सर्जेराव पाटील आदी. जखमींना मदत करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.