Header Ads

Header ADS

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड टाकून निघृण खून..!

 

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड टाकून निघृण खून..!


लेवाजगत न्युज चोपडा:-शहरापासून जवळच असलेल्या एका गावाच्या शेतामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा डोक्यात दगड टाकून बलात्कार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.



चोपडा शहरापासून १५ ते २० किलोमीटर असलेल्या गावात एक मोलमजुरी करणारा परिवार शेत शिवारामध्ये राहतो. या परिवारातील एक १४ वर्षीय मुलगी ही घराजवळ असताना संशयित आरोपी तेथे आला. त्याने या मुलीला शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. त्यानंतर तिची डोक्यात दगड टाकून निर्घण हत्या केली. दरम्यान ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवली.


यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच एलसीबी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी फॉरेनसिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. तर मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याबाबत पोलिसांचे कामकाज सुरू होते. या घटनेमुळे चोपडासह जळगाव जिल्हा हादरला आहे. संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव स्थापनेचे चैतन्यदायी वातावरण असताना दुसरीकडे मात्र चोपडा तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.