Header Ads

Header ADS

"सावदा गावात राशन धान्य वाटपाचा मुहूर्त निघेना "कार्ड धारकांच्या परिसर पासून धान्य दुकान लांब असल्याने त्रास

 

ration-grain- distribution-mohurat-in-Savada-village- without-card-holder-from-the-premises-of-the-grain-shop-is-long-trouble


"सावदा गावात राशन धान्य वाटपाचा मुहूर्त निघेना "कार्ड धारकांच्या परिसर पासून धान्य दुकान लांब असल्याने त्रास

   लेवाजगत न्यूज सावदा- येथील सरकारमान्य धान्याचे दुकानात जुलै महीन्याच्या वाटपाचा तिडा लवकरात लवकर सोडावा- मसुद खान व  कार्यकर्त्यांचे मागणी.

      सध्या स्थितित सावदा गाव वगळून सर्व धान्य दुकानात वाटप जोर शोराने चाललेली आहे. तरी गावाचे एकही सरकार मान्य धान्य दुकानातून वाटपाची हालचाली होतांना दिसत नाही.अनेक सेवार्थ लोकांचे म्हणणे असे आहे कि आम्ही अनेकदा राशन  वाटपाचे दुकानात विचारायला गेले असतांना त्यांचे म्हणणे आहे कि आमचे सर्व्हर सुरू होत नसल्याने वाटप थांबलेली आहे.तरी सावदा गाव सोडून आपले गावापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या फैजपुर गावात  २ ऑगस्ट पासून धान्याचे  वाटप  होत आहे. तरी लोकांचे म्हणणे  कि फैजपुर गावात राशन धान्याचा वाटप ज्या पद्धतीने चालू असेल किंवा तिथले धान्य दुकानात  वाटप करणारयांना विचारपुस करुन सावदा येथे पण त्या पद्धतीने वाटप शुरु करावी.धान्य वाटप करणारयांचे म्हणणे आहे कि आमचे मशीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कारणाने आमच्या मशीनचे सरवर डाऊनलोड होत नसल्याने तरी हि योजना संपूर्ण महाराष्ट्राभर मध्ये चालू आहे.पण काही लोकांनचे म्हणणे आहे कि ३ कि.मी. अंतरावर असलेल्या फैजपुर गावात राशन धान्याचे का वाटप चालू आहे.असे अनेक गोरगरीब महिलांचे म्हणणे आहे.

 सावदा गावात राशन धान्याचे वाटप करण्या मध्ये का टाळाटाळहोत चाललेली आहे. गोरगरीब महिला आपली रोजी सोडुन सरकार मान्य धान्याचे दुकानाकडे आशेचे किरणने बघायला मजबुर झाले आहे. तरी लोकांचे आशाचा तिडा केव्हा सुटेल अशा प्रश्न अनेक गोरगरीब महिला'च्या मनात उपस्थितीत होत चाललेला आहे.धान्याचा प्रश्न सुटून आम्ही गोरगरिबांच्या पदरात धान्य पडेल .  धान्याला सरकार मान्य धान्याचा पुरवठा लागुन आमचा उदरनिर्वाहाला चालना मिळेल अशा प्रश्न अनेक गोरगरीब महिलाच्या मनात उपस्थितीत होत चाललेला आहे. 




     काही महिला'चे म्हणणे आहे कि जिथे सर्वात जास्त राशन कार्डाची वाटप एका दिशाची होत असेल तर अश्या धान्य वाटपाचा दुकान त्या'चे वाड्यात असायला हव्यात.कारण काही महिलांचे म्हणणे आहे कि राशन दुकान मध्ये धान्य केव्हा येतो आम्हाला माहित पडत नाही कारण आमच्या वाड्या पासून काही धान्य दुकान भरपूर दुर असल्याने आम्हाला कळत नाही. महिलांचे म्हणणे अशे आहे कि आम्ही कामावर गेले असतांना अनेक वेळा आमचे राशन आम्हाला दुसऱ्या महिन्याला मिळालेला नाही. राशन वालया कडे सर्वांचे मो.न.असतांना मेसेज पण कळवत नाही. तरी आमची मागणी आहे कि ज्या वाडयांचे राशन कार्ड  जास्त असेल तेथेच सरकार मान्य धान्याचे दुकान असावे.असे अनेक गोरगरीब महिलांसह मसुद खान यांचे म्हणणे आहे. नाही तर अर्धीवाटप  सुशिक्षित बेरोजगारांना त्या वाड्याच्या वाटपाची व्यवस्था मा.तहसीलदार साहेबांनी विभागणी करून  गोरगरीब महिलांची समस्या शासनाने सोडून महिलांचे हाल होण्या पासून थांबतील व महिलांना न्याय मिळतील अशी अपेक्षा गोरगरीब महिलांचे म्हणणे आहे.

       सर्वर डाऊन मुळे वाटपात अडचणी

 संपूर्ण तालुक्यात त राशन वाटपासाठी असलेले 5g पॉस  मशीन सर्वर व नेट डाऊन असल्याने अडचणी येत आहे .त्यामुळे धान्यवाटप थांबलेली असून आम्ही त्याबद्दल रावेर तहसीलदारांना निवेदनही दिले आहे असे  स्वस्त धान्य दुकानदारांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.