Header Ads

Header ADS

मंत्री रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम...!

 मंत्री रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम...!

Salute to the readiness of the Minister-Defenders


शुक्रवार, २३ ऑगस्ट हा दिवस वरणगाव परिसरासाठी आक्रीतच घेऊन आला. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला काठमांडूजवळ भीषण अपघात होऊन बसमधील भाविकांपैकी २७ यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, आचेगाव, सुसरी, दर्यापूर या गावात अनपेक्षित घटनेने जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. देशाबाहेर घडलेल्या अपघाताने सर्वच धास्तावले. मृत्यूमुखी पडलेले आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची चिंता फार मोठी होती. 





या दुःखद प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवत, शुक्रवारी दुपारीच वरणगाव गाठले. मृतांच्या आप्तेष्टांचे सांत्वन करत त्यांना धीर देत शुक्रवारीच सायंकाळी संभाजीनगरहून विमानाने त्या रात्री साडे नऊ वाजता दिल्लीला पोहचल्या. प्रधानमंत्रीकडून विशेष परवानगी घेऊन त्या शनिवारी सकाळी नेपाळला पोहचल्या. तेथे पोहचल्याबरोबरच त्यांनी सर्वप्रथम जखमींची भेट घेत त्यांना धीर दिला. जखमींच्या परिवाराशीही मोबाईलवरुन बोलल्या. मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीसाठी पाठपुरावा केला. + मृतदेह जळगावला आणण्यासाठी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशीबोलल्या. राजनाथ सिंग विदेशात असतांनाही त्यांनीही लगेच प्रतिसाद दिला. मृतदेह आणण्यासाठी एअरफोर्सचे स्पेशल विमान उपलब्ध करुन दिले. आधी एअरफोर्सचे विमान ओझर (नाशिक) येथे लँडींग होईल, असे ठरले होते मात्र, रक्षाताई यांनी मृतदेह घेवून येणारे एअरफोर्सचे विमान जळगाव विमानतळापर्यंत नेण्याची विनंती केली. पंतप्रधानांचा जळगाव दौरा असल्यामुळे जळगाव विमानतळ परिसरात नो फ्लाईंग झोन लागू करण्यात आला होता. त्यामुळे रक्षाताईंनी प्रयत्नपूर्वक विशेष परमिट मिळविले. त्यानंतर विमानात मृतदेह ठेवल्यानंतर सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी विमान काठमांडुहून‘टेक ऑफ' झाले.


तत्पूर्वी, जे काठमांडुला थांबून होते, असे ४८ पेक्षा जास्त भाविक तेथे होते. त्यांच्यासाठी गोरखपूर (ट्रेन क्र.२०१०४) मध्ये स्वतंत्र एसी कोचची व्यवस्था केली. त्यासाठी त्या केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलल्या. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगत विनंती केली. त्यांनी स्पेशल एसी कोच उपलब्ध करुन देण्याबाबत रेल्वेविभागाला सूचना दिल्या. त्या ४८ भाविकांचे रेल्वे भाडेही रक्षाताईंनी भरले. गोरखपूरहून ही ट्रेन शनिवारी रात्री दहा वाजता भुसावळकडे निघाली. रक्षाताई खडसे यांनी अपघातग्रस्त जखमी तसेच मृतदेह आणण्यासाठी विशेष विमान आणि उर्वरित भाविकांना रेल्वेने आणण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, ती त्यांच्या संवेदनशिलतेचे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीचे ते एक प्रतिक आहे. त्यांची धडपड व तत्परता ही वाखाणण्याजोगी बाब असून त्यांच्या प्रयत्नांनी अपघातग्रस्तांना नुसताच धीर दिला नाही तर 'मी आहे ना' तुमचे दुःख निवारण करण्यासाठी... याची जाणीव भाविकांना झाली.. म्हणूनच म्हणावेसे वाटते - ताई, तुमच्या तत्परतेला सलाम

 संदर्भ-साईमत 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.