Header Ads

Header ADS

युवा नेतृत धनंजय चौधरी यांची केळी बेल्ट परिसरात कृतज्ञता संवाद यात्रेद्वारे गाठीभेटी

Youth-led-Dhananjay-Chaudhary-Banana-Belt-Environment-Gratitude-Meeting-Through-Dhananjaya-Chaudhary


युवा नेतृत धनंजय चौधरी यांची केळी बेल्ट परिसरात कृतज्ञता संवाद यात्रेद्वारे गाठीभेटी

लेवाजगत न्यूज चिनावल-आज दिनांक १८ रोजी जळगाव जिल्ह्यातील केळी बेल्ट मानले जाणारे गावे चिनावल व  कुंभारखेडा या गावी युवा नेतृत्व माननीय धनंजय भाऊ चौधरी यांचा कृतज्ञता दौरा पार पडला.

आज कृतज्ञते दौरा यात्रेनिमित्त सकाळी धनंजय भाऊ चौधरी यांनी चिनावल या गावी प्रथम राम मंदिर व जागृत हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ केला तदनंतर चिनावल ग्रामस्थांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीवरती जल पूजन तसेच`एक व्यक्ती एक वृक्ष 'या उक्तीप्रमाणे गावातील वेगवेगळी पदे भूषवून मयत झालेल्या व्यक्तींच्या नावे वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर चिनावल गावातील ग्रामस्थांच्या अडीअडचणीच्या वेळी कामा येणारे रावेर यावल तालुक्याचे लाडके आमदार श्री दादा चौधरी यांच्या विषयी कृतज्ञता गौरव उद्गार चिनावल गावातील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये काढण्यात आले. सदर मीटिंग दरम्यान प्रास्ताविक श्री संजय भालेराव सर यांनी केले तसेच चंद्रकांत भंगाळे यांनी आपले मत प्रकट केले. तदनंतर धनंजय भाऊ चौधरी यांनी गावकऱ्यांची संवाद साधला व वेगवेगळे समस्यांविषयी गावकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.




त्यानंतर दुपारी एक वाजता कुंभारखेडा या गावी ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि राम मंदिर येथे दर्शन घेऊन कुंभारखेडा या गावी कृतज्ञता यात्रेस सुरुवात झाली यात्रेदरम्यान गावात फेरी घेऊन गावात असणाऱ्या समस्यांविषयी धनंजय भाऊ यांनी माहिती घेतली त्यानंतर ग्रामस्थांच्या हस्ते कुंभारखेडा येथे जलपूजन तसेच माध्यमिक विद्यालय कुंभारखेडा येथे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी कुंभारखेडा ग्रामस्थांच्या वतीने माननीय धनंजय भाऊ यांचा स्वागत सत्कार ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आला याप्रसंगी गावातील असंख्य तरुणांची उपस्थिती होती.

चिनावल येथे जलपूजन सरपंच.ज्योती संजय भालेराव, हेमांगी भंगाळे, ममता बोरवले, मा. सरपंच नरेंद्र गेंडा पाटील, जि.प. सदस्य सुरेखा नरेंद्र पाटील,चंद्रकांत भंगाळे यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बापू गेंदू पाटील,संजू महाजन,दामोदर महाजन, बन्सी गारसे, किशोर बोरवले, नितीन भालेराव, दिवाकर मालखेडे, प्रभाकर वानखेडे, गणेश चौधरी, आनंद ठाकरे,अखलाक दादा खाटीक,चंद्रकांत भंगाळे,जितेंद्र नेमाडे, किरण नेमाडे, गोटू नेमाडे,  सुनील महाजन , प्रफुल्ल बोंडे, हे उपस्थित होते.

कुंभारखेडा येथे जलपूजन पंडित महाजन, मा.सरपंच पि.के बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती , शांताराम राणे, जगन येवले, कृष्णा राणे, प्रवीण राणे, सुनील फेगडे, विजय राणे उपस्थित होते..

चिनावल येथे  वृक्षारोपण सरपंच.ज्योती संजय भालेराव, हेमांगी भंगाळे, ममता बोरवले, मा. सरपंच नरेंद्र गेंडा पाटील, जि.प. सदस्य सुरेखा नरेंद्र पाटील ,चंद्रकांत भंगाळे,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बापू गेंदू पाटील ,संजू महाजन, दामोदर महाजन, बन्सी गारसे, किशोर बोरवले, चंद्रकांत भंगाळे, नितीन भालेराव, दिवाकर मालखेडे, प्रभाकर वानखेडे, गणेश चौधरी, आनंद ठाकरे,अखलाक दादा खाटीक, जितेंद्र नेमाडे, किरण नेमाडे, गोटू नेमाडे,  सुनील महाजन  प्रफुल्ल बोंडे, हे उपस्थित होते.

तसेच खिजर उर्दू हायस्कूल चिनावल येथे वृक्षारोपण

मा.धनंजय भाऊ चौधरी, खीजर हायस्कूल चे अध्यक्ष खा.हयात खा.वयात, असिफ शेठ, निसार शेठ, मुद्दसिर भाई, मुस्तकीन मेंबर यांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभारखेडा येथे वृक्षारोपण पंडित महाजन, माजी सरपंच पि.के. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शांताराम राणे ,जगन येवले ,कृष्णा राणे ,प्रवीण राणे ,सुनील फेगडे ,विजय राणे उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.