महिलांनी आयुष्यभर इतरांच्या आधाराने जगण्यापेक्षा आत्मनिर्भर बनायला शिका डॉ.एस.व्ही.जाधव धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे युवती सभेचे उद्घाटन
महिलांनी आयुष्यभर इतरांच्या आधाराने जगण्यापेक्षा आत्मनिर्भर बनायला शिका डॉ.एस.व्ही.जाधव
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे युवती सभेचे उद्घाटन
लेवाजगत न्यूज फैजपूर:-येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, २० रोजी लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून युवती सभेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापिका डॉ. सिंधू भंगाळे यांनी समाजामध्ये महिलांचे स्थान या विषयावर मार्गदर्शन केले. समाजात स्त्री-विषयीची मानसिकता अजून ही बदललेली नाही, महिलांना पाहिजे तेवढ्या संधी नाही, सुरक्षेची हमी नाही, स्त्रियांनी स्वतः-स्वतःलां ओळखले पाहिजे, स्त्रीला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी कुटुंबाने सुद्धा प्रयत्न करायला हवे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव यांनी ही समाजामध्ये स्त्रियांना स्थान आहे पण महत्त्व नाही,आयुष्यभर इतरांच्या आधाराने जगण्यापेक्षा आत्मनिर्भर बनायला शिका असे सांगीतले. प्रसंगी मंचावर विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभाप्रमुख डॉ.जयश्री पाटील यांनी, सूत्रसंचालन कु.छाया शिरसाळे व आभार रोहिणी माळी यां विद्यार्थिनीने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सविता वाघमारे, डॉ सरला तडवी
,डॉ.सीमा बारी, डॉ.पल्लवी भंगाळे प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.तीलोत्तमा चौधरी, प्रा.आरती भिडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत