उरी बाळगून स्वप्न विकासाचे,बांधूनी धरणे आणि रस्ते,घडविले ज्याने जळगाव जिल्ह्याला,कृतज्ञेप्रती नमस्कार आमचा मधुकरराव चौधरी या महापुरुषाला
उरी बाळगून स्वप्न विकासाचे,बांधूनी धरणे आणि रस्ते,घडविले ज्याने जळगाव जिल्ह्याला,कृतज्ञेप्रती नमस्कार आमचा मधुकरराव चौधरी या महापुरुषाला
लेवाजगत न्यूज रावेर- धनंजयभाऊ चौधरी यांचा कृतज्ञता संवाद यात्रेला खिरवड,थेरोळे,धुरखेडा,बोहर्डी या गावातील ग्रामस्थांनी संवाद साधला.आज प्रथम खिरवड या गावी श्रीकृष्ण मंदिर येथे दर्शन घेऊन यात्रेस सुरुवात करण्यात आली काही गावांमध्ये पाणीसाठा विपुल प्रमाणात असून सुद्धा क्षारयुक्त पाणी असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतात.अशी तक्रार गावकऱ्यांकडून करण्यात आली तसेच खिरवळ या गावी जिजाबराव पाटील यांनी प्रास्ताविक करून धनंजय भाऊ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बहुसंख्य प्रमाणात खिरवळ ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामस्थांना शेताचे पाणंद रस्ते तयार करून देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी व धनंजय भाऊंनी सहकार्याने रस्ता करून देण्याचे ठरले त्याचप्रमाणे खिरवड रस्त्यावरती पूल बांधकाम करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.नंतर थेरोळे,धुरखेडा व बोहर्डी येथे धनंजय भाऊ भेट दिली त्याप्रसंगी सदर गावांमध्ये संवाद यात्रेस सहभाग नोंदवला. त्याप्रसंगी भाऊंसोबत मनमोकळेपणाने संवाद करण्यात आला.
थेरोळा येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती माननीय धनंजयभाऊ चौधरी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले व जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा येथे वृक्षारोपण केतकी जितेंद्र पाटील, नियती नरेंद्र पाटील शाळेतील मुलींच्या हस्ते करण्यात आले व उपसरपंच नम्रता नितीन पाटील, संगीता राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य,तेजस रमेश पाटील,ईश्वर आटकळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील युवा मंडळी नितीन पाटील,राजेंद्र पाटील,गणेश पाटील, दिलीप पाटील,किशोर कुलकर्णी हे उपस्थित होते.
खिरवड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यइथे वृक्षारोपण सरपंच पूनम गोपाळ कोडी उपसरपंच शेक जाहीर शेख हैदर,जिजाबराव चौधरी,निलेश साहेबराव चौधरी यांच्या हस्ते व जलपूजन त्या प्रसंगी गावातून ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
धुरखेडा येथे वृषारोपन उपसरपंच लक्ष्मण पाटील, सुरेश भोई, संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील युवा मंडळी प्रथमेश धनगर, पाटील हर्षल पाटील, कुंदन भोई, राहुल पाटील,पांडुरंग पाटील,शुभम बेलदार,विष्णू बेलदार, प्रथमेश धनगर ,यांची उपस्थिती लाभली..
बोहर्डे येथे सतीश वानखेडे, कमलाकर वानखेडे, प्रवीण पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी गावातील वरिष्ठ मंडळी प्रकाश चुडामन, नारायण पाटील, कैलास पाटील,अंबादास पाटील व जलपूजन
माजी सभापती सागरबाई धुडकू वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी युवा व ज्येष्ठ नागरिक नितीन पाटील, श्याम पाटील, कमलाकर वानखेडे, नितीन ननवरे, दादाराव तायडे,अर्जुन कोळी,श्रावण वानखडे वैभव पाटील, रोशन पाटील हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत