तासखेडा येथे जि.प शाळेत दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न
तासखेडा येथे जि.प शाळेत दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न
लेवाजगत न्युज तासखेडा:-
येथे सालाबादप्रमाणे यंदा ही जि प शाळेत आज दि ३० रोजी सकाळी ११ वाजता श्रीकृष्ण जन्म अष्ठमी चे अवचितसाधत गोपाळकाला आणि दही हंडी फोडण्याचा एकत्र कार्यक्रम संपन्न झाला.
याबाबत सविस्तर असे की येथील मुख्याध्यापक तायडे व उपशिक्षक महाजन यांना शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमाची सुद्धा आवड असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन हे नेहमी सादर करत असतात. त्यामुळे मुलांची शैक्षणीक गुणवत्ता सुद्धा वाढलेली आहे. अभ्यासक्रमासह मुलांना अशा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शाळा व्यवस्थापन समिती सह पालकवर्ग आणि ग्रामस्थ नेहमी सहकार्य करीत असतात.
आजच्या कार्यक्रमा प्रसंगी यावेळी गावचे ग्रां .प . सरपंच रमेश भादू इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधीकारी तसेच ग्रामस्थ शालेय स्थापन समितीचे सर्व पदाधीकारी व इयत्ता १ ली ते ४थी पर्यंत चे विद्यार्थी विद्यार्थीनींनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महाजनसर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक तायडे सरांनी मानले व कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत