सावदा पो. स्टे. हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ०३ नराधमांना ०३ तासात घेतले ताब्यात
सावदा पो. स्टे. हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ०३ नराधमांना ०३ तासात घेतले ताब्यात
लेवाजगत न्युज सावदा:-
सावदा पो. स्टे. हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या परिचित तीन मुलांनी ओळखीचं फायदा घेऊन तिला फुस लावून घेऊन गेले व तिचे इच्छे विरुद्ध तीचेवर आळीपाळीने शारीरिक अत्याचार व तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सावदा पो. स्टेला माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. रेड्डी सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री नखाते सर यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पो.स्टेचे सपोनि विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोलीस स्टेशन कडील पथक यांनी गतीमान हालचाल करून ०३ तासाच्या आत २ संशियीत आरोपी व १ विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे प्राथमिक तपास करून विधिसंघर्षित बालकास मा बालन्यायालय व ईतर दोघांना मा. सत्र न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.
पुढील तपास सावदा पोलीस स्टेशन करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत